loader image
[ays_poll id=7]

महावितरण कंपनीच्या बेजबाबदार कारभाराविरोधात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आंदोलनाचा इशारा

Mar 6, 2023

महावितरण कंपनीच्या ढिसाळ व बेजबाबदार कारभारा विरोधात मनमाड शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हा प्रमुख गणेश धात्रक, संतोष बळीद, उप जिल्हा प्रमुख, संतोष जगताप, तालुका संघटक तसेच शहरप्रमुख माधव शेलार यांनी दिला आहे.
महावितरण कंपनीने त्यांच्या कामाचा बोजा कमी करण्यासाठी प्रायव्हेट ठेकेदार नेमले मात्र कंपनीने प्रायव्हेट ठेकेदारांकडून वेळोवेळी योग्य तो मेन्टेनन्स करून न घेतल्यामुळे झाडांची कापणी न केल्यामुळे, वीजपुरवठा वारंवार खंडीत होत आहे. सध्या राज्यभर १० वी व १२ वी च्या बोर्डाच्या परिक्षा सुरु आहेत मात्र रात्रभर वीजपुरवठा खंडीत असल्याने विद्यार्थी व पालकांतर्फे संताप व्यक्त केला जात आहे.

राज्यभर व शहरात वातावरण बदलामुळे घरोघरी व्हायरल इन्फेक्शनमुळे लहान मुले व वयोवृध्द नागरिक आजारी आहेत अशी गंभीर परिस्थिती असतांनाही दिवसाला ४ तास ते ४८ तासापर्यंत वीजपुरवठा खंडीत होतो. वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाचे फोनही नेहमी बंदच असतात तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांचे फोन स्विचऑफ असतात. मात्र वीजबिल भरण्याबाबात महावितरणचे मेसेज मात्र न चुकता येतात, महावितरण कंपनीला खंडीत वीजपुरवठ्याचा फॉल्ट ४८ तास काम करुनही सापडत नाही मात्र सामान्य वीजग्राहकाचे १ महिन्याचे बिल थकले की त्यांचे घर मात्र लगेच सापडते. त्यामुळे सामान्य नागरिकांनी खंडीत विजपुरवठ्याबाबत कोणाकडे चौकशी करायची, तसेच कोणाशी चर्चा करायची अशा प्रश्न संतप्त नागरिकांतर्फे उपस्थित केला जात आहे. तसेच महावितरण कंपनीतर्फे सोशल मिडीयावर ४ तासाने लाईट येतील काम सुरु आहे असे खोटे मेसेज पसरवून सामान्य नागरिकांची दिशाभूल केली जात आहे.

महावितरण कंपनीने त्यांच्या बेजबाबदार व ढिसाळ कामात तात्काळ सुधारणा न केल्यास शहरातील सर्व वीजग्राहकांना सोबत घेवून महावितरण कंपनीच्या विरोधात ज्वलंत असे आंदोलन छेडण्यात येईल व त्याच्या होणाऱ्या परिणामास सर्वस्वी महावितरण कंपनी प्रशासन जबाबदार याची नोंद घ्यावी अशा तीव्र इशारा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे देण्यात आला आहे .

अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयातर्फे ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमांतर्गत वागदर्डी धरण परिसरात प्लास्टिक मुक्त अभियान’

मनमाड महाविद्यालयातर्फे ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमांतर्गत वागदर्डी धरण परिसरात प्लास्टिक मुक्त अभियान’

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड यांच्या राष्ट्रीय सेवा...

read more
मनमाड चे आराध्य दैवत श्री निलमणी गणेशाच्या पार्थिव मूर्तीची ढोल ताशा च्या गजरात पालखी तून विसर्जन महामिरवणुक संपन्न

मनमाड चे आराध्य दैवत श्री निलमणी गणेशाच्या पार्थिव मूर्तीची ढोल ताशा च्या गजरात पालखी तून विसर्जन महामिरवणुक संपन्न

मनमाड - मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणारा व गणेश उत्सवा तील प्रथम मानाचा गणपती म्हणून...

read more
श्री गुरुगोविंद सिंग हायस्कूल मनमाड चे शालेय शासकीय शिकाई (मार्शल आर्ट ) , जीत -कुणे -दो व थांग-था मार्शल आर्ट स्पर्धेत घवघवीत यश…

श्री गुरुगोविंद सिंग हायस्कूल मनमाड चे शालेय शासकीय शिकाई (मार्शल आर्ट ) , जीत -कुणे -दो व थांग-था मार्शल आर्ट स्पर्धेत घवघवीत यश…

  नाशिक येथे मीनाताई ठाकरे स्टेडियम येथे झालेल्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र...

read more
बघा व्हिडिओ : पाण्याखाली श्रीगणेशाची प्रतिमा रांगोळी ने साकारत बाप्पाचे अनोखे विसर्जन…!

बघा व्हिडिओ : पाण्याखाली श्रीगणेशाची प्रतिमा रांगोळी ने साकारत बाप्पाचे अनोखे विसर्जन…!

या गणेशोत्सवात लाडक्या श्रीगणेशाच्या आगमनाने दहा दिवस सर्वत्र प्रसन्नमय वातावरण झाले. बाप्पाच्या...

read more
बघा व्हिडिओ-भाद्रपद महागणेशोत्सव 2024 निमित्त वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी

बघा व्हिडिओ-भाद्रपद महागणेशोत्सव 2024 निमित्त वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी

छप्पन महाभोग (महानैवेद्य) कार्यक्रमाचे आयोजन संपन्न गणेश भक्तांचा उदंड प्रतिसाद मनमाड - आम्ही...

read more
नाशिक जिल्हा बँकेने ९ कर्जदारांना बजावल्या अंतीम जप्तीच्या नोटीसा; थकबाकीदारांमध्ये भीतीचे वातावरण ?

नाशिक जिल्हा बँकेने ९ कर्जदारांना बजावल्या अंतीम जप्तीच्या नोटीसा; थकबाकीदारांमध्ये भीतीचे वातावरण ?

नांदगाव : मारुती जगधने नांदगांव तालुक्यातील जिल्हा बँकेचे कर्ज घेतलेल्या व थकित झालेल्या ९...

read more
.