loader image
[ays_poll id=7]

जागतिक महिला दिनानिमित्त लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटी तर्फे रविवारी महिलांसाठी सायकल स्पर्धा

Mar 8, 2023

जागतिक महिला दिनानिमित्त लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटी तर्फे रविवार दिनांक 12 मार्च 2023 रोजी मुली व महिलांसाठी भव्य अशी सायकल स्पर्धा आयोजित केली आहे. जास्तीत जास्त मुलींनी व महिलांनी या स्पर्धेत भाग घेऊन,महिला कोणत्याही क्षेत्रात कमी नाहीत हे दाखवून द्यावे असे आवाहन सायक्लोथन 2023 या स्पर्धेचे प्रोजेक्ट चेअर पर्सन ला. डॉ निलेश राठी,ला. डॉ. अर्चना राठी,ला. गणेश हडपे,ला. सौ संगीता कदम यांनी केले आहे.स्पर्धकांनी स्वतःची सायकल घेऊन यावी,सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे,तसेच दोन गटातील प्रथम तीन स्पर्धकांना ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात येणार आहे,लायन्स गार्डन आय यु डी पी ते लासलगाव फाटा कमान व परत लायन चिल्ड्रन गार्डन आय यू डी पी सायकल स्पर्धेचा मार्ग आहे तरी सर्व स्पर्धकांनी सकाळी सात वाजता लायन्स चिल्ड्रन गार्डन आय यू डी पी येथे जमावे असे आवाहन लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटी चे अध्यक्षा ला सौ वैशाली वाणी,सचिव ला रेखा येणारे,खजिनदार ला सुचिता खताळ यांनी केले आहे,याच ठिकाणी आहारतज्ञ सौ जंगम मॅडम यांचे महिलांसाठी स्वास्थ्यवर्धक आहार याविषयी मार्गदर्शनपर व्याख्यान होणार आहे,लायन्स क्लब आयोजित पीस पोस्टर कॉन्टॅक्ट या चित्रकला स्पर्धेचे बक्षीस वितरण ही याच ठिकाणी होणार आहे,तरी जास्तीत जास्त महिला व मुलींनी या सायकल स्पर्धेत भाग घेऊन महिला सशक्तिकरण व सबलीकरण दाखवून द्यावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

ठिकाण—लायन्स गार्डन आय यु डी पी गणपती मंदिरा शेजारी वेळ सकाळी 7 वाजता,दिनांक 12 मार्च 2023 ,रविवार

अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ – अवकाळी पाऊस आणि गारपिटीने झालेल्या नुकसानीची तहसीलदार सौंदाणे यांनी केली पाहणी

बघा व्हिडिओ – अवकाळी पाऊस आणि गारपिटीने झालेल्या नुकसानीची तहसीलदार सौंदाणे यांनी केली पाहणी

नांदगाव आणि मनमाड शहरासह ग्रामीण भागात गेल्या दोन-तीन दिवसात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे...

read more
बघा व्हिडिओ – लासलगाव येथे सराफी दुकानात भरदिवसा तीन तोळ्याची पोत चोरण्याचा प्रयत्न

बघा व्हिडिओ – लासलगाव येथे सराफी दुकानात भरदिवसा तीन तोळ्याची पोत चोरण्याचा प्रयत्न

लासलगाव ( ठिणगी वृत्तसेवा ) लासलगाव शहरातील मेनरोड वरील अत्यंत वर्दळ असलेल्या ठिकाणी एका नामांकित...

बी जी दरगुडे पब्लिक स्कूल मनमाड येथे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण उत्साहात संपन्न

बी जी दरगुडे पब्लिक स्कूल मनमाड येथे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण उत्साहात संपन्न

मनमाड - मनमाड येथील बी जी दरगुडे  पब्लिक स्कूलच्या शालेय परिसरात भव्य स्टेज व मंडप व्यासपीठ सजावट...

read more
.