loader image
[ays_poll id=7]

बिरोबाची साकुरी येथे जागतिक महिला दिनानिमित्त हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न

Mar 8, 2023

आज जागतिक महिला दिनानिमित्त बिरोबाची साकुरी येथे हळदी कुंकवाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सौ.अंजुम ताई सुहास कांदे यांच्या उपस्थितीत साकुरी येथे जागतिक महिला दीन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या प्रसंगी सौ.अंजुम ताई कांदे यांनी महिलांना मार्गदर्शन केले. तसेच उपस्थित महिलांना हळदी कुंकवाचे वान भेट देण्यात आले.
या नंतर आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या माध्यमातून साकुरी गावात महिला बचत गट भवन बांधण्यात आले असून त्याचे उद्घाटन सौ.अंजुम ताई कांदे, बाळू आप्पा कांदे, यांच्या हस्ते करण्यात आला तर सोबतच परिसरातील विविध विकासकामांचे ही उद्घाटन या वेळी करण्यात आले.
या प्रसंगी धनंजय कांदे, तालुका प्रमुख पंकज दादा निकम, शिवसेना महिला आघाडीच्या तालुका प्रमुख विद्याताई जगताप, संगीताताई बागुल, रोहिणी मोरे, सोनाली निकम, सुनीता ताई खेमणार, वंदना शेवाळे, सीमा जाधव, मालती वाघ, सुवर्णा साळुंखे, ज्योती कदम, राणी लाड, सविता नवले, कृषी विभाग काळे मॅडम, उज्वला माळी, अखिला शेख तसेच साकुरी गावातील व परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी निमगाव गट प्रमुख व महिला बचत गट सी आर पी सौ.मनीषाताई इंगळे, ग्रामसंघ प्रमुख भारती ताई ठोके, तसेच निमगाव गटातील महिला वर्गाने मेहनत घेतली.

अजून बातम्या वाचा..

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला....

read more
नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

मनमाड -- नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात...

read more
फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन - श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा ! फलक रेखाटन...

read more
मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड - 79 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्ये ला 14 ऑगस्ट या अखंड भारत दिना निमित्ताने...

read more
.