loader image
[ays_poll id=7]

मविप्र शैक्षणिक संकुलात आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त कार्यक्रम

Mar 8, 2023

मराठा विद्या प्रसारक समाजाच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मनमाड येथे आज महिला दिनाच्या निमित्ताने राज्य कर निरीक्षक श्रीमती वंदना पगार यांचे महिला सशक्तीकरण यावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डी डी गव्हाणे, अभिनव शाळेचे मुख्याध्यापक श्री वाघ सर, स्थानिक व्यवस्थापन समितीच्या महिला सदस्य श्रीमती दामले, बेग, इ. उपस्थित होत्या तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदर्श इंग्लिश मिडीयम स्कूल च्या प्राचार्या श्रीमती पूनम मढे मॅडम या होत्या. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डी डी गव्हाणे यांनी उपस्थीत मान्यवरांचे स्वागत केले व मतदानाच्या हक्कासाठी सुरू झालेल्या या चळवळीचे रूपांतर जागतिक महिला दिनात झाले. उपस्थित विद्यार्थिनी व महिलांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
राज्य लोकसेवा आयोगाच्या कर निरीक्षक या पदाला गवसणी घालत असताना वंदना पगार यांना काय अनुभव आले याचे कथन त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले. याप्रसंगी सर्वच महिलांनी आपले मनोगत व्यक्त केले. अभिनव शाळेच्या श्रीमती झाल्टे मॅडम, कवडे मॅडम, ज्युनियर कॉलेज च्या कर्डेल मॅडम, भुरुक मॅडम, काकळीज मॅडम, आदर्श इंग्लिश मिडीयम स्कूल च्या शेलार मॅडम, शेळके मॅडम, धात्रक मॅडम आदी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती आहेर मॅडम यांनी केले तर आभार डॉ फापाले मॅडम यांनी मांडले.

अजून बातम्या वाचा..

भारतीय जनता पार्टी येवला शहर मंडल यांच्यावतीने संघटन पर्व सदस्यता नोंदणी अभियान

भारतीय जनता पार्टी येवला शहर मंडल यांच्यावतीने संघटन पर्व सदस्यता नोंदणी अभियान

२०२४ कार्यशाळेचे आयोजन येवला शहरात दहा हजार सदस्य नोंदणी चे उद्दिष्ट स्थानिक स्वराज्य संस्था विजया...

read more
मनमाड डॉक्टर्स असोसिएशन तर्फे सत्कार : नांदगाव तालुक्याच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध – आमदार कांदे

मनमाड डॉक्टर्स असोसिएशन तर्फे सत्कार : नांदगाव तालुक्याच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध – आमदार कांदे

मनमाड - मनमाड डॉक्टर असोसिएशनच्या सदस्यांनी नवनिर्वाचीत आमदार सुहास आण्णा कांदे व अंजुमताई कांदे...

read more
भाजपा मनमाड शहर व भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने सदस्य नोंदणी प्रशिक्षण कार्यशाळे चे आयोजन

भाजपा मनमाड शहर व भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने सदस्य नोंदणी प्रशिक्षण कार्यशाळे चे आयोजन

मनमाड शहरात भाजपा चे पाच हजार सदस्य नोंदणी चे उद्दिष्ट ❗विश्वातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असणाऱ्या...

read more
मनमाड शहर भाजपा मंडलाच्या वतीने भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या 100 व्या जयंती निमित्ताने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन

मनमाड शहर भाजपा मंडलाच्या वतीने भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या 100 व्या जयंती निमित्ताने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन

संपूर्ण देशातील भाजपा कार्यकर्त्यांन चे प्रेरणा स्थान भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय...

read more
नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी संदीप जेजुरकर, सरचिटणीसपदी निलेश वाघ यांची बिनविरोध निवड

नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी संदीप जेजुरकर, सरचिटणीसपदी निलेश वाघ यांची बिनविरोध निवड

मनमाड - नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघाच्या झालेल्या सभेत तालुकाध्यक्षपदी एबीपीमाझा, पुण्यनगरी,...

read more
.