loader image
[ays_poll id=7]

रक्तदानाने जीव वाचवण्याऱ्या आरएमएस च्या संजीवनी!

Mar 8, 2023


नाशिक रोड ( प्रतिनिधी )
08 मार्च 2023
– सरकारी नोकरदार महिला आणि स्वतःसाठी जगण्याचे निवांत क्षण यांचे गुणोत्तर काही जमत नाही परंतु जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नाशिकरोड येथील रेल्वे मेल सेवा या कार्यालयात महिलांनी काही क्षण स्वतःसाठी जगत आपल्या स्व अस्तित्वाची जाणीव इतर सहकाऱ्यांना करून दिली.
महिलांनी केवळ अवडंबर न करता रक्तदान करून एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला. महिलांनी एकत्र येत रक्त हे हिंसक मार्गाने नाल्यातून न वाहता माणसाच्या धमन्या मधून
वहावे यासाठी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.आर एम एस कार्यालय नाशिकरोडचा परिसर छान सामजिक संदेश देणाऱ्या रांगोळीने सजला होता ज्यात स्रीतत्वाचे महत्व विषद केले गेले होते कार्यालयात प्रथम दर्शनी भागात काढलेली रांगोळी सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होती.
सदर कार्यक्रम प्रसंगी डॉक्टर विभावरी शिहोकर यांनी महिलांच्या आरोग्याविषयी आपले विचार व्यक्त करीत महिलादिना निमित्त महिलांना मार्गदर्शन केले व कामाच्या ताण तणावाचे सुरेख विश्लेषण करीत रक्तदान शिबिर सारखी अनोखी संकल्पना राबवून वेदनेला अचूक क्षणी संजीवनी देणाऱ्या अनेक संजीवनीच कौतुक केले.
या प्रसंगी कुमारी ज्ञानदा पिसे हिने महिला दिन प्रसंगी आपले विचार इंग्लिश भाषेत व्यक्त करून भारतीय पोस्ट मध्ये कार्यरत महिलांच्या कष्टाला सलाम करीत त्यांना शुभेच्छा दिल्या.आरएमएस महिला कर्मचारी शारदा पिसे यांच्या त्या कन्या आहेत. सदर कार्यक्रम आदरणीय एस आर ओ आर.के.साळी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला सरकारी महिलांनी अगदी निर्धास्त होऊन कार्य करावे त्यांच्या हिताची रक्षा करण्यासाठी आम्ही कटिबध्द आहोत असे ठामपणे सांगितले पुढे येणाऱ्या काळात महिलांना अधिक चांगले वातावरण कार्यालयात उपलब्ध करून दिले जाईल या बद्दल सगळ्या महिलांना आश्वासन दिले.कार्यक्रमाची प्रस्तावना श्रीमती सायली कुयटे यांनी केली तर मुख्य महिला प्रतिनिधी या नात्याने श्रीमती नीलिमा शिरोडे यांनी सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देत महिला या त्याग आणि समर्पणाचे प्रतीक असतात हे सांगितले.श्रीमती शिरोडे यांच्या महिला नेतृत्वात आरएमएस विभाग प्रगतीपथावर असून विभागात चांगली कामगिरी करीत आहे.
महिलांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी एनएफपीई संघटना सदैव आपल्या पाठीशी राहील आणि वेळ प्रसंगी अनेक समस्यांवर प्रशासनाशी चार हात करून महिलांना न्याय मिळून देईल असे प्रतिपादन संघटना सचिव श्रीकांत एम महाजन यांनी केले.आर एम एस कार्यालयात पार पडलेल्या या सोहळ्याचे बहारदार सूत्रसंचालन श्रीमती शारदा पिसे यांनी केले विविध काव्य ओळी आणि विचार यातून अत्यंत सुंदररित्या एक एक माळ गुंफत कार्यक्रम पूर्णत्वास नेला.
आरएमएस विभागात एनएफपीई या संघटनेचे सर्कल सचिव ए.बी.शिवतरे साहेब तसेच विभागीय सचिव संजय भोपले यांच्या आदेशाने सदर कार्यक्रम पार पडला या कार्यक्रम प्रसंगी कॉम.वी.पी. वाणी कॉम.एस.के.डोईफोडे हे उपस्थित होते समस्त महिला कर्मचाऱ्या तर्फे आभार मानण्यात आले .

 


अजून बातम्या वाचा..

भारतीय क्रीडा प्राधिकरण व भारतीय वेटलिफ्टिंग संघटना यांचे संयुक्त विद्यमाने अस्मिता खेलो इंडिया महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन

भारतीय क्रीडा प्राधिकरण व भारतीय वेटलिफ्टिंग संघटना यांचे संयुक्त विद्यमाने अस्मिता खेलो इंडिया महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन

मनमाड येथे रविवार दिनांक १०/०८/२०२५ रोजी जय भवानी अद्यावत व्यायामशाळा येथे करण्यात आले आहे नाशिक...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालया च्या स्पर्धा देशभक्त नागरिक निर्माण करणारी कार्य शाळा

मनमाड सार्वजनिक वाचनालया च्या स्पर्धा देशभक्त नागरिक निर्माण करणारी कार्य शाळा

बाजीराव महाजन मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्व.लोकमान्य टिळक आणि लोक शाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या...

read more
.