loader image
[ays_poll id=7]

सेंट झेवियर हायस्कूल मध्ये महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा

Mar 10, 2023

मनमाडः येथील सेंट झेवियर हायस्कूल मध्ये महिला दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षा सिस्टर रेखा तसेच शाळेचे मुख्याध्यापक मॅल्कम नातो, पर्यवेक्षिका सिस्टर ज्योत्स्ना व सर्व शिक्षिका उपस्थित होत्या.यावेळी झालेल्या कार्यक्रमात मुख्याध्यापकांनी उपस्थित सर्व स्त्री शिक्षिकेंचा गुलाबपुष्प देऊन सन्मान केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षा सिस्टर रेखा यांनी महिलांच्या समाजातील योगदानाबद्दल माहिती दिली. तर मुख्याध्यापकांनी आपल्या भाषणातून उपस्थित महिला शिक्षिकांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी भाविका शिरसाठ हिने केले तर आभार प्रदर्शन कुमारी यशस्वी वैद्य हिने केले. सौ लीना जाधव सौ. रचना अहिरे, सौ. एलिझाबेथ शेल्टे व सौ. सरिता निकम यांनी महिला सन्मानार्थ एक गीत सादर केले. या गितास सौ. अंजलीना झेवियर श्री. अशोक गायकवाड सर यांनी संगीताची साथ दिली. कु. पल्लवी झाल्टे हिने समाजातील कर्तृत्ववान स्त्रियांचा आपल्या भाषणात आढावा घेतला. कु. आर्या उबाळे, कु. धनश्री झाल्टे, कु. अनुष्का शंखपाळ, कु. जागृती आहिरे व कु. समृद्धी झाल्टे या मुलींनी थोर महिलांच्या वेशभूषेत येऊन त्यांचे विचार उपस्थितांना ऐकवलेत.

अजून बातम्या वाचा..

महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड, ता. नांदगाव,जि. नाशिक महाविद्यालयास ‘स्वायत्त दर्जा’ प्रदान

महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड, ता. नांदगाव,जि. नाशिक महाविद्यालयास ‘स्वायत्त दर्जा’ प्रदान

  मनमाड :- महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड,...

read more
व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक, अनिल पारीक आणि द्वारकेश पारीक ह्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी मनमाड बंद

व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक, अनिल पारीक आणि द्वारकेश पारीक ह्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी मनमाड बंद

मनमाड -- मनमाड शहर व्यापारी महासंघ चे अध्यक्ष राजाभाऊ पारीक तसेच त्यांचे लहान बंधू अनिल पारीक व...

read more
एक दिवशीय जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत महामानव फॉउंडेशन,मालेगाव संघ विजेता.

एक दिवशीय जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत महामानव फॉउंडेशन,मालेगाव संघ विजेता.

  मनमाड:-एम.एस.स्पोर्ट्स,मनमाड आयोजित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रेल्वे क्रिडांगण,मनमाड...

read more
मनमाडमधील धाडसी घरफोडी करणारे तीन सराईत गुन्हेगार अटकेत, १ कोटी ५ लाखांचा माल जप्त

मनमाडमधील धाडसी घरफोडी करणारे तीन सराईत गुन्हेगार अटकेत, १ कोटी ५ लाखांचा माल जप्त

मनमाड : मनमाड शहरातील डमरे कॉलनी परिसरातील व्यावसायिक मुर्तजा अब्दुल हुसेन रस्सीवाला यांच्या घरात...

read more
.