loader image
[ays_poll id=7]

के आर टी शाळेत आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा

Mar 10, 2023

कवी रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे विश्वस्त धनंजय निंभोरकर यांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले. यावेळी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर.उपप्राचार्य वैभव कुलकर्णी. मुख्याध्यापक दीपक व्यवहारे व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन इयत्ता पहिली व इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी केलेले होते. इयत्ता पहिलीच्या कुश पाटील. उत्कर्षा ठाकरे .आरव जोशी.सायुरी केदारे यांनी आपल्या भाषणात “वार नाही तलवार आहे ती समशेरीची धार आहे स्त्री म्हणजे अबला नाही ती तर धगधगता अंगार आहेत “अशा शब्दात इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले .इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांनी महिला दिनाचे औचित्य साधून वेशभूषा धारण केली. स्वरा गंगेले तिने नर्सची वेशभूषा साकारली. ब्लेसी राठोड ने मदर तेरेसा ची वेशभूषा साकारली .तानिया सुखडिया ने सानिया नेहवाल ची वेशभूषा साकारली .शरयू नागरे कार्तिकी सांगळे यांनी राणी लक्ष्मीबाईची वेशभूषा साकारली दर्शनी साळवे हिने सावित्रीबाईची वेशभूषा साकारली श्रेशा घटकर हिने शिक्षिकेची ची वेशभूषा साकारली इयत्ता सहावीच्या गौरी सोनवणे एक सुंदर गीत गायले “जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा एक आईचा आईचा एक ताईचा त्यानंतर समीक्षा आव्हाड हिने ज्याला स्त्री आई म्हणून कळली तो जिजाऊचा शिवबा झाला आणि ज्याला स्त्री बहीण म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळली तो राधेचा श्याम झाला आणि ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळली तो सीतेचा राम झाला अशा शब्दात विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यानंतर रुद्राणी देशमानकर हिने आपले विचार प्रकट केले या विद्यार्थ्यांना सौ तेजस्विनी चांदेकर व कुमारी अमिता झाडे यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन देवश्री शर्मा हिने केले.

अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ-भाद्रपद महागणेशोत्सव 2024 निमित्त वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी

बघा व्हिडिओ-भाद्रपद महागणेशोत्सव 2024 निमित्त वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी

छप्पन महाभोग (महानैवेद्य) कार्यक्रमाचे आयोजन संपन्न गणेश भक्तांचा उदंड प्रतिसाद मनमाड - आम्ही...

read more
नाशिक जिल्हा बँकेने ९ कर्जदारांना बजावल्या अंतीम जप्तीच्या नोटीसा; थकबाकीदारांमध्ये भीतीचे वातावरण ?

नाशिक जिल्हा बँकेने ९ कर्जदारांना बजावल्या अंतीम जप्तीच्या नोटीसा; थकबाकीदारांमध्ये भीतीचे वातावरण ?

नांदगाव : मारुती जगधने नांदगांव तालुक्यातील जिल्हा बँकेचे कर्ज घेतलेल्या व थकित झालेल्या ९...

read more
मनमाड महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा… “हिंदी फक्त राष्ट्रभाषाच नव्हे तर विश्व भाषा” – श्री.राजेंद्र जगताप

मनमाड महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा… “हिंदी फक्त राष्ट्रभाषाच नव्हे तर विश्व भाषा” – श्री.राजेंद्र जगताप

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या पदव्युत्तर...

read more
भाद्रपद महागणेशोत्सव ➖2024 निमित्त रविवारी वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी छप्पन महाभोग (महानैवेद्य) व श्री सत्यविनायक महापूजा या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

भाद्रपद महागणेशोत्सव ➖2024 निमित्त रविवारी वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी छप्पन महाभोग (महानैवेद्य) व श्री सत्यविनायक महापूजा या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

मनमाड - आम्ही परंपरा पाळतो... आम्ही संस्कृती चे रक्षण करतो.... हे ब्रीद घेऊन मनमाड शहरात धार्मिक...

read more
मनमाड करांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा तृप्ती पाराशर आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

मनमाड करांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा तृप्ती पाराशर आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

सुवा फिजी येथे १४ ते २१ सप्टेंबर २०१४ रोजी होणाऱ्या कॉमनवेल्थ चँपियनशिप साठी महाराष्ट्रातील एकमेव...

read more
मनमाड शहर भाजपा तर्फे आरक्षण विरोधी राहुल गांधी व हिंदू विरोधी शरद पवार यांचे विरोधात जोरदार घोषणा बाजी करीत निषेध आंदोलन

मनमाड शहर भाजपा तर्फे आरक्षण विरोधी राहुल गांधी व हिंदू विरोधी शरद पवार यांचे विरोधात जोरदार घोषणा बाजी करीत निषेध आंदोलन

राहुल गांधी यांनी अमेरिकेतील एका मुलाखती दरम्यान काँग्रेस भारतात सत्तेत आल्यास आरक्षण काढून टाकू...

read more
कासलीवाल स्कूलमध्ये माता पालकांसाठी कुकिंग बॅटल (कुकिंग विदाऊट फ्लेम्स ) स्पर्धेचे आयोजन…..

कासलीवाल स्कूलमध्ये माता पालकांसाठी कुकिंग बॅटल (कुकिंग विदाऊट फ्लेम्स ) स्पर्धेचे आयोजन…..

नांदगांव : दि १३ मारुती जगधने दि.13 सप्टेंबर 2024 नांदगाव येथील जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडियम...

read more
.