महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे महिला कल्याण व तक्रार निवारण समितीच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ” लिंगभाव समानता: वित्तीय सक्षमीकरण व तंत्रज्ञान “या विषयावर प्राचार्य डॉ. ए. व्ही. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. तज्ञ मार्गदर्शक श्रीमती अशुमती लोहारकर, ठाणे येथील वुई ऑल इंडिया असोसिएशन क्लबच्या संचालिका,यांच्या हस्ते या कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. आपल्या मार्गदर्शनपर व्याख्यानात त्यांनी ऑनलाइन क्लासेस, कोर्सेस,मार्केटिंग वर्चुअल क्लास रूम, आर्टिफिशियल इंटेलिजन्स व डिजिटल क्षेत्रातील क्रांती व त्याचबरोबर महिलांचा यामध्ये असणारा सहभाग याविषयी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन सादर केले. विद्यार्थिनींनी बदलत्या काळानुसार नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून आपले करिअर निश्चित करावे यासाठी आवाहन केले.
तज्ञ मार्गदर्शक श्रीमती संगीता माळी, भारतीय आयुर्विमा मंडळ मनमाड शाखेच्या असिस्टंट ऍडमिनिस्ट्रेटर ऑफिसर यांनी विद्यार्थिनींनी आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावे व भविष्यकाळासाठी योग्य ती गुंतवणूक कशी करावी व गुंतवणुकीचे फायदे कसे असतात याविषयीची उत्कृष्ट माहिती कोविड काळाचा संदर्भ देऊन स्पष्ट केले.
श्रीमती पवार, भारतीय आयुर्विमा मंडळ मनमाड शाखेच्या अधिकारी यांनी विद्यार्थिनींना शिकत असताना आर्थिक दृष्ट्या कसे सक्षम होता येईल याविषयीची माहिती दिली .त्याचबरोबर एलआयसी मध्ये सुद्धा स्त्रिया व विद्यार्थिनी कसे काम करू शकतात व स्वतःच्या पायावर कसे उभे राहू शकतात याविषयीची उदाहरणे देऊन वित्तीय सक्षमता कशी असते याविषयीची माहिती विशद केली.
आपल्या अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. ए. व्ही. पाटील यांनी स्त्रियांविषयी गौरव उद्गार काढून म्हंटले की, स्त्री ही कुटुंबाचा आर्थिक कणा मजबूत करण्यासाठी सतत प्रयत्नशील असते व आर्थिक घडी व्यवस्थित राहावी म्हणून सदैव झटत असते. स्त्रियांनी आर्थिक दृष्ट्या सक्षम होणे ही काळाची गरज आहे व त्याचबरोबर नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून विद्यार्थिनींनी आपले करिअर निश्चित करावे असे आवाहन केले.
या कार्यशाळेचे संयोजन महिला कल्याण व तक्रार विभागाच्या अध्यक्षा प्रा. सौ. कविता काखंडकी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. श्रीमती वर्षराणी पेढेकर यांनी केले व आभार प्रदर्शन श्रीमती डॉ. आरती छाजेड यांनी केले. कार्यक्रम संपन्न होण्याकरीता हिंदी विभाग प्रमुख डॉ. जे.वाय. इंगळे, डॉ. गणेश गांगुर्डे ,डॉ. मिलिंद अहिरे प्रा.डि.वी. सोनवणे यांनी मोलाचे सहकार्य केले. वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. जी. एल. शेंडगे ,कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य श्रीमती पालवे, महिला कल्याण व तक्रार निवारण समितीच्या सर्व सदस्या, विद्यार्थिनी, प्राध्यापक वर्ग व कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.

राशी भविष्य : ११ ऑक्टोबर २०२५ – शनिवार
मेष : भाग्यकारक घटना घडेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. वृषभ : काहींना...