loader image
[ays_poll id=7]

के आर टी विद्यालयात सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी साजरी

Mar 11, 2023

कवी रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. त्यावेळेस मुख्याध्यापक दीपक व्यवहारे. जनरल सेक्रेटरी वैभव कुलकर्णी. विश्वास धनंजय निंभोरकर. उपस्थित होते .कार्यक्रमाचे आयोजन इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी केले. इयत्ता सहावीच्या तृषांत गायकवाड. समीक्षा पगारे .यांनी आपले मनोगत व्यक्त केले.” स्त्रियांच्या अंधाऱ्या जीवनात पेटविल्या ज्ञानाच्या ज्योती. म्हणून तर आज जगती. अमर आहे सावित्री अमर आहे सावित्री” क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका तसेच मुख्याध्यापिका होत्या वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. विवाहानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाईंना लिहायला. वाचायला. शिकवले व स्त्री शिक्षणाचा पायारचला .क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांनी १जानेवारी १८४८ मध्ये पुण्याच्या बुधवार पेठेत मुलींची पहिला शाळा काढली .सावित्रीबाईंनी बालविवाह. केशवपन .सतीप्रथा .अशा वाईट प्रथांना विरोध केला .त्यांनी काव्यफुले बावनकशी सुबोध रत्नाकर असे काव्यसंग्रह लिहून समाज जागृती केली अखेर १० मार्च १८९७ रोजी या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी अखेरचा श्वास घेतला .अशा या तेजस्वी ज्ञानज्योती क्रांतीज्योती सावित्रीबाईंना माझे कोटी कोटी प्रणाम या विद्यार्थ्यांना अमिता झाडे यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आभार प्रदर्शन समर्थ इप्पर यांनी केले.

अजून बातम्या वाचा..

सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

जनकल्याण रक्तकेंद्राच्या ३६ वा वर्धापन दिनानिमित्त शंकराचार्य संकुल गंगापूर रोड येथे शिबीर...

read more
के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

दिनांक 26/8/2025 रोजी के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र...

read more
भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

आज दि.२६ ऑगस्ट २०२५ रोजी शिक्षण मंडळ भगूर संचालित नूतन माध्यमिक विद्यालय...

read more
मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड - बुधवार दिनांक 27 /08/2025 रोजी भाद्रपद शुध्द श्री गणेश चतुर्थी निमित्त सकाळी ठीक 09-30...

read more
.