loader image

नांदगाव तालुक्यातील तांदुळवाडी येथे वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू

Mar 14, 2023

नांदगाव तालुक्यातील तांदुळवाडी येथे सोमवारी ता.१३ रात्री शेतात काढलेले कांदे झाकण्यासाठी गेलेले शेतकरी नाना गमन चव्हाण वय (६०) यांच्या अंगावर विज पडून मृत्यू झाल्याची घटना घडली तर तालुक्यातील हिरेनगर येथे नारायण नामदेव बिन्नर या शेतकऱ्याच्या दोन म्हशी विज पडून दगवल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
सविस्तर माहिती अशी कि सोमवारी ता.१३ ला रात्री अचानक वातावरण बदल होत पावसाला सुरुवात झाली तांदूळवाडी येथे शेतात काढलेला कांदा झाकण्यासाठी नाना गमन चव्हाण हे तांदूळवाडीचे उपसरपंच सुदाम काळे यांच्या दुचाकीवर शेतात गेले.शेतात गेल्यावर काही वेळातच विजेचा कडकडाट सुरू झाला नाना चव्हाण कांदे झाकत असताना अचानक यांच्या अंगावर वीज कोसळली व क्षणात त्यांचा मृत्यू झाला ही घटना उपसरपंच प्रत्यक्षात पहिली त्यांनी त्वरित ही घटना चव्हाण कुटुंबियाना कळविले या दुर्देवी घटनेबद्दल तांदूवाडी गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.सदर घटनेची माहिती मिळताच तलाठी अमित उगले, पोलीस पाटील,सरपंच यांनी घटनास्थळी जात पंचनामा केला आहे.

अजून बातम्या वाचा..

व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या रेड रिबन क्लब, राष्ट्रीय...

read more
श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

मनमाड - शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

मनमाड - भारतीय जनता पार्टी देश स्तरावर विविध क्षेत्रामध्ये काम करीत असते कामगार क्षेत्रामध्ये...

read more
.