loader image
[ays_poll id=7]

आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या स्वखर्चातून मतदार संघात मोफत आरोग्य सेवा

Mar 15, 2023

नांदगाव सोमनाथ घोंगाणे

आ. सुहास कांदे यांच्या स्वखर्चातून नांदगाव विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी मोफत विविध सेवा पुरविण्यात येत आहेत, आज नांदगाव तालुक्यातील मांडवड गावात हा कॅम्प लावण्यात आला होता, 2 दवाखाना, 2 शासकीय सुविधा कार्यालय, डॉक्टर, सिस्टर, डोळ्यांचे डॉक्टर, सेतू प्रतिनिधी, आशा ताई, शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते असा ताफा नागरिकांच्या सेवेत आज कार्यरत होता.
सकाळी 10 वाजता उपस्थितांच्या हस्ते नारळ फोडून आजच्या कॅम्प ची सुरुवात करण्यात आली. पी.आर.पाटील सर यांनी आपल्या मनोगतात सर्व सुविधांबाबत उपस्थित नागरिकांना माहिती दिली, सर्व टीम चे स्वागत केले तर आमदारांचे आभार मानले.
मांडवड , लक्ष्मीनगर, आझादनगर तसेच मांडवड गावातील नागरिकांनी या सेवांचा लाभ घेतला.
५३० नागरिकांनी रुग्णसेवेचा लाभ घेतला तर डोळ्यांची तपासणी केली, यात ३०६ नागरिकांना मोफत चष्मे देण्यात आले यात मोठ्या संख्येने वयोवृध्द, व महिलांनी सहभाग घेतला, यात ६६ जणांना डोळ्यांची शस्त्रक्रियेचा सल्ला डॉक्टरांनी दिला असून लवकरच त्यांचे मोफत ऑपरेशन केले जाणार आहे. या शिवाय २६४ जणांनी सेतू सुविधांसाठी संपर्क केला यामध्ये रेशन कार्ड संबंधित अडचणी तर निराधार योजना, पेन्शन योजनेसाठी अनेकांनी कागदपत्र जमा केली. मोफत आरोग्य सेवा, डॉक्टरांचा सल्ला, औषधे, डोळ्यांची तपासणी, ड्रॉप, चष्मा, सेतू सुविधांचा लाभ घेतलेल्या नागरिकांनी आमदार सुहास आण्णा कांदे यांचे आभार मानले. तर मांडवड येथील ग्रामपंचायत सरपंच, उप सरपंच, कर्मचारी, तसेच गावातील नागरिकांनी व कार्यकर्त्यांनी उपक्रम यशस्वीतेसाठी सहकार्य केले.

डॉ.संकेत मार्कंड, डॉ.कीर्ती आहेर, डॉ. आशा जगताप, डॉ.राहुल पाटील यांनी रुग्ण तपासणी केली. या प्रसंगी मजूर फेडरेशनचे चेअरमन प्रमोद भाबड, जिल्हाप्रमुख किरण देवरे, सरपंच अंकुश डोळे, उपसरपंच विठ्ठल आहेर, अशोक निकम, योगेश आहेर, डॉ.प्रवीण निकम, सागर आहेर, सुधीर देशमुख, पी.आर.पाटील सर, भावराव बागुल, सुनील जाधव, आण्णा मुंढे, लक्ष्मी नगर सरपंच शंकर उगले, अंकुश उगले, रमेश घाडगे, कैलास आहेर, त्रंबक आहेर, सुदाम आहेर, वाल्मीक काकळीज, वाल्मीक थेटे, सर्जेराव थटे, गोरख थेटे, मच्छिंद्र निकम, रंगनाथ पिंगळे, साहेबराव गरुड, बापू हांडे आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कॅम्प साठी प्रकाश शिंदे, निशांत बोडके, महेंद्र आहेर, सतीश बोरसे, गणेश खैरनार,भरत पारख, ओमकार चिकने, यांनी मेहनत घेतली .

अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ-भाद्रपद महागणेशोत्सव 2024 निमित्त वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी

बघा व्हिडिओ-भाद्रपद महागणेशोत्सव 2024 निमित्त वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी

छप्पन महाभोग (महानैवेद्य) कार्यक्रमाचे आयोजन संपन्न गणेश भक्तांचा उदंड प्रतिसाद मनमाड - आम्ही...

read more
नाशिक जिल्हा बँकेने ९ कर्जदारांना बजावल्या अंतीम जप्तीच्या नोटीसा; थकबाकीदारांमध्ये भीतीचे वातावरण ?

नाशिक जिल्हा बँकेने ९ कर्जदारांना बजावल्या अंतीम जप्तीच्या नोटीसा; थकबाकीदारांमध्ये भीतीचे वातावरण ?

नांदगाव : मारुती जगधने नांदगांव तालुक्यातील जिल्हा बँकेचे कर्ज घेतलेल्या व थकित झालेल्या ९...

read more
मनमाड महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा… “हिंदी फक्त राष्ट्रभाषाच नव्हे तर विश्व भाषा” – श्री.राजेंद्र जगताप

मनमाड महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा… “हिंदी फक्त राष्ट्रभाषाच नव्हे तर विश्व भाषा” – श्री.राजेंद्र जगताप

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या पदव्युत्तर...

read more
भाद्रपद महागणेशोत्सव ➖2024 निमित्त रविवारी वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी छप्पन महाभोग (महानैवेद्य) व श्री सत्यविनायक महापूजा या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

भाद्रपद महागणेशोत्सव ➖2024 निमित्त रविवारी वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी छप्पन महाभोग (महानैवेद्य) व श्री सत्यविनायक महापूजा या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

मनमाड - आम्ही परंपरा पाळतो... आम्ही संस्कृती चे रक्षण करतो.... हे ब्रीद घेऊन मनमाड शहरात धार्मिक...

read more
मनमाड करांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा तृप्ती पाराशर आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

मनमाड करांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा तृप्ती पाराशर आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

सुवा फिजी येथे १४ ते २१ सप्टेंबर २०१४ रोजी होणाऱ्या कॉमनवेल्थ चँपियनशिप साठी महाराष्ट्रातील एकमेव...

read more
मनमाड शहर भाजपा तर्फे आरक्षण विरोधी राहुल गांधी व हिंदू विरोधी शरद पवार यांचे विरोधात जोरदार घोषणा बाजी करीत निषेध आंदोलन

मनमाड शहर भाजपा तर्फे आरक्षण विरोधी राहुल गांधी व हिंदू विरोधी शरद पवार यांचे विरोधात जोरदार घोषणा बाजी करीत निषेध आंदोलन

राहुल गांधी यांनी अमेरिकेतील एका मुलाखती दरम्यान काँग्रेस भारतात सत्तेत आल्यास आरक्षण काढून टाकू...

read more
कासलीवाल स्कूलमध्ये माता पालकांसाठी कुकिंग बॅटल (कुकिंग विदाऊट फ्लेम्स ) स्पर्धेचे आयोजन…..

कासलीवाल स्कूलमध्ये माता पालकांसाठी कुकिंग बॅटल (कुकिंग विदाऊट फ्लेम्स ) स्पर्धेचे आयोजन…..

नांदगांव : दि १३ मारुती जगधने दि.13 सप्टेंबर 2024 नांदगाव येथील जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडियम...

read more
.