loader image
[ays_poll id=7]

शासनाने जाहीर केलेले ३०० रुपये अनुदान तुटपुंजे – ६०० रुपये देण्याची शेतकऱ्याची आर्त हाक

Mar 15, 2023

कातरवाडी ताः चांदवड येथील शेतकरी भागवत झालटे यांनी राज्य शासनाने जाहीर केलेल्या कांदा अनुदानाची रक्कम प्रति क्विंटल रुपये ६०० करण्याची मागणी केली आहे. राज्यातील शेतकरी संकटात सापडलेला आहे अवकाळी पावसाने शेतातील उभे पिक वाया गेले आहे. शेतकरी संपावर गेल्यावर सगळं महाग होईल कुठलाही भाजीपाला मार्केट मध्ये किंवा बाजारात येऊ दिला जाणार नाही दूध व सर्व पालेभाज्या त्यामुळे सरकारने लवकरात लवकर विचार करून भाव निश्चित करावे आणि अनुदान रू.600 जाहीर करावे सोयबीन, कापूस, हरभरा, कांद्याला बाजारात भाव मिळत नाही. कांद्याला यावेळी ४००-५०० रुपये भाव मिळत असून हा भाव अत्यंत कमी आहे. सरकारने प्रति क्विंटल ३०० रुपये अनुदान जाहीर केले आहे. ते अत्यंत तुटपुंजे आहे. कांदा उत्पादनास येणाऱ्या खर्चाचा विचार करून सरकारने हे अनुदान किमान ६00 रुपये करावे, अशी मागणी शेतकरी सामाजिक कार्यकर्ता भागवत झाल्टे यांनी केली आहे. शेतकरी वारंवार असमानी सुलतानी संकट सापडत आहे त्यात चांदवड तालुक्यातील गावामध्ये नुकसान भरपाई चे पैसे मिळत नाही फक्त शेजारी देवल्यातच मिळतात शेतमालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी त्या पिकावर नांगर रोटर फिरवत आहे भाजी पाला हि कवडीमोल भावात विकला जात आहे अतिवृष्टीमुळे खरिप वाया गेला आणि आता पावसामुळे रब्बीचे नुकसान झाले शेतकरी पुरता संकटात सापडला आहे. कांद्याने तर यावेळी शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे केले आहे. एक क्विंटल कांदा उत्पादनासाठी ११०० ते १२०० रुपये खर्च येतो. कांदा काढण्यासच विंटलला ३०० रुपये लागतात हा खर्च पाहता सरकारने जाहीर केलेले ३०० रुपयांचे अनुदान हे अत्यंत तुटपुंजे असून सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. अर्थसंकल्पात शेतकऱ्यांवर सरकार मेहरबान असल्याचे चित्र दाखवण्यात आले. घोषणाच घोषणा करण्यात आल्या आहेत प्रत्यक्षात मात्र हे सरकार शेतकऱ्यांना मदत देताना हात आखडता घेत दिसून आले आहे. संकटात असलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे ही सरकारची जबाबदारी आहे. सरकारने आपल्या निर्णयाचा पुन्हा विचार करून किमान ६००.रु प्रमाणे कांद्याला अनुदान द्यावे.

एक शेतकरी भूमिपुत्र श्र भागवत राजाराम झाल्टे कातरवाडी तालुका चांदवड

अजून बातम्या वाचा..

नाशिक जिल्हा बँकेने ९ कर्जदारांना बजावल्या अंतीम जप्तीच्या नोटीसा; थकबाकीदारांमध्ये भीतीचे वातावरण ?

नाशिक जिल्हा बँकेने ९ कर्जदारांना बजावल्या अंतीम जप्तीच्या नोटीसा; थकबाकीदारांमध्ये भीतीचे वातावरण ?

नांदगाव : मारुती जगधने नांदगांव तालुक्यातील जिल्हा बँकेचे कर्ज घेतलेल्या व थकित झालेल्या ९...

read more
मनमाड महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा… “हिंदी फक्त राष्ट्रभाषाच नव्हे तर विश्व भाषा” – श्री.राजेंद्र जगताप

मनमाड महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा… “हिंदी फक्त राष्ट्रभाषाच नव्हे तर विश्व भाषा” – श्री.राजेंद्र जगताप

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या पदव्युत्तर...

read more
भाद्रपद महागणेशोत्सव ➖2024 निमित्त रविवारी वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी छप्पन महाभोग (महानैवेद्य) व श्री सत्यविनायक महापूजा या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

भाद्रपद महागणेशोत्सव ➖2024 निमित्त रविवारी वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी छप्पन महाभोग (महानैवेद्य) व श्री सत्यविनायक महापूजा या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

मनमाड - आम्ही परंपरा पाळतो... आम्ही संस्कृती चे रक्षण करतो.... हे ब्रीद घेऊन मनमाड शहरात धार्मिक...

read more
मनमाड करांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा तृप्ती पाराशर आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

मनमाड करांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा तृप्ती पाराशर आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

सुवा फिजी येथे १४ ते २१ सप्टेंबर २०१४ रोजी होणाऱ्या कॉमनवेल्थ चँपियनशिप साठी महाराष्ट्रातील एकमेव...

read more
मनमाड शहर भाजपा तर्फे आरक्षण विरोधी राहुल गांधी व हिंदू विरोधी शरद पवार यांचे विरोधात जोरदार घोषणा बाजी करीत निषेध आंदोलन

मनमाड शहर भाजपा तर्फे आरक्षण विरोधी राहुल गांधी व हिंदू विरोधी शरद पवार यांचे विरोधात जोरदार घोषणा बाजी करीत निषेध आंदोलन

राहुल गांधी यांनी अमेरिकेतील एका मुलाखती दरम्यान काँग्रेस भारतात सत्तेत आल्यास आरक्षण काढून टाकू...

read more
कासलीवाल स्कूलमध्ये माता पालकांसाठी कुकिंग बॅटल (कुकिंग विदाऊट फ्लेम्स ) स्पर्धेचे आयोजन…..

कासलीवाल स्कूलमध्ये माता पालकांसाठी कुकिंग बॅटल (कुकिंग विदाऊट फ्लेम्स ) स्पर्धेचे आयोजन…..

नांदगांव : दि १३ मारुती जगधने दि.13 सप्टेंबर 2024 नांदगाव येथील जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडियम...

read more
.