loader image
[ays_poll id=7]

नांदगाव बाजार समितीतील कांदा व्यापारी नॉट रिचेबल हमाल मापारी वर्गाचे पगार लटकले .

Mar 16, 2023


नांदगाव सोमनाथ घोंगाणे

नांदगाव बाजार समितीतील कांदा व्यापारी नॉट रिचेबल झाल्याने माथाडी बोर्डाच्या हमाल मापारी वर्गाचे पगार लटकले.
याबाबत अधिक माहीती अशी की नांदगाव बाजार समितीत कांदा व्यापारी नॉट रिचेबल होण्याची घटना नवीन नाही . या अगोदर सुद्वा अशा घटना घडलेल्या आहे. सुमारे ५ ते ६ महिन्यापुर्वी नव्याने आदीत्य ट्रेडर्स या नावाने कांदा खरेदीचा परवाना काढून व्यापार सुरू केलेला नांदगाव तालुक्या बाहेरील व्यापारी याने कांदा खरेदी सुरू केली. दोन ते तीन महिने कांदा खरेदी सुरळीत चालू करून शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला . व शेतकरी पैसे जमा ठेवून सदर व्यापारी नॉट रिचेबल झाल्याने सोशल मिडीया मध्ये उलट सुलट चर्चाना उधान आले असून शेतकरी वर्गात चितेंचे वातावरण पसरले आहे.
यात विशेष म्हणजे बाजार समितीत काम करणारे ७८ हमाल मापारी यांचे माहे फेर्बुवारी महिन्याचे पगार (वेतन) आज पर्यंत न झाल्याने हमाल मापारी युनीयन ने बाजार समितीला व माथाडी कामगार बोर्डाला तक्रार दिली आहे.
बाजार समितीत शेतकऱ्यानी विक्री केलेल्या शेतमालाचे वजन माप झालेनंतर व्यापारी शेतकऱ्याच्या पावतीतून हमाली / तोलाई / वाराई कपात करूण तिचा भरणा पुढील महिण्याच्या १ ते ५ तारखेपर्यत माथाडी बोर्डात भरणा करतो व त्यानंतर हमाल / मापारी वर्गाचे पगार होतात. सदर आदीत्य ट्रेडर्स या व्यापाऱ्याने माहे फेर्बुवारी महिन्यात शेतकरी वर्गाची कपात केलेली हमाली/ तोलाई माथाडी बोर्डा कडे आज पर्यंत भरणा न केल्याने माथाडी बोर्डाच्या हमाल मापारी यांचे पगार झालेले नाही.
याबाबत बाजार समितीचे सचीव अमोल खैरणार यांच्याशी संपर्क केला असता . त्यांनी सांगितले की आदित्य ट्रेडर्स यांनी शेतकऱ्यांच्या पावतीतून कपात केलेले हमाल तोलाईचे पैसे भरणा केलेला नाही म्हणून हमाल / मापारी यांचे पगार झालेले नाही. आम्ही संबधीत व्यापारी यांच्या संर्पकात आहे. लवकरच तो भरणा करेल असे सांगत आहे.
शेतकरी वर्गाचे लाखो रूपये अडकले असून शेतकरी वर्गाचे कांदा या शेती मालाचे पैसे दोन दिवसात बाजार समितीने वसूल करून न दिल्यास कांदा उत्पादक संघटना मोठे आंदोलन करणार असल्याचे तालुका युवा अध्यक्ष सोमनाथ मगर यांनी सांगितले.


अजून बातम्या वाचा..

के आर टी हायस्कूलअँड ज्युनिअर कॉलेजमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस म्हणून साजरा करण्यात आला.

के आर टी हायस्कूलअँड ज्युनिअर कॉलेजमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस म्हणून साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाचे आयोजन इयत्ता आठवी व इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांनी केले होते. त्यावेळेस शाळेचे...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये किशोरवयीन विदयार्थ्यांनींना सुरक्षितेसाठी मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न.

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये किशोरवयीन विदयार्थ्यांनींना सुरक्षितेसाठी मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न.

  मनमाड:-एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड मध्ये किशोरवयीन विदयार्थीनींच्या स्वयं...

read more
.