loader image
[ays_poll id=7]

आधार कार्ड धारकांना खूषखबर – तीन महिने करा आधार अपडेट ते ही मोफत

Mar 17, 2023

तुमचे आधार कार्ड १० वर्ष जुने असेल तर तुम्हाला ते अपडेट करणे आवश्यक आहे. प्रत्येक १० वर्षांनी आधार कार्ड अपडेट करणे अनिवार्य असून तुम्हाला तुमचा आधार अपडेट करायचा असेल तर यंदा तुम्हाला एक पैसाही खर्च करण्याची गरज नाही. सरकारने देशातील कोट्यवधी जनतेला मोठा दिलासा दिला आणि भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) नागरिकांना आधारसाठी ऑनलाइन दस्तऐवज अपडेट करण्याची सुविधा मोफत करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. म्हणजेच आता आधार अपडेट करण्यासाठी एकही पैसा खर्च करावा लागणार नाही. मात्र, ही सुविधा ऑनलाइन अपडेट करण्यासाठीच मिळेल आणि ते देखील फक्त तीन महिन्यांसाठी.

आधारकार्ड धारक जर त्यांचे आधार अपडेट करण्यासाठी फिजिकल काउंटरवर गेल्यास त्यांना पैसे भरावे लागतील. UIDAI ने सांगितले की आधार धारक तीन महिन्यांसाठी मोफत आधार अपडेट सुविधेचा लाभ मिळेल. आधार कार्ड धारक १५ मार्च २०२३ ते १४ जून २०२३ पर्यंत त्यांचे आधार कार्ड ऑनलाइन मोफत अपडेट करू शकतात.

सध्या आधार कार्डात कोणत्याही प्रकारचे अपडेट करण्यासाठी तुम्हाला ५० रुपये शुल्क भरावा लागतो. तसेच आधार केंद्रावर जाऊनही दस्तऐवज अपडेट करण्यासाठी ५० रुपये शुल्क भरावे लागायचे. यापूर्वी, आधार पोर्टलवर कागदपत्रे अपडेट करण्यासाठी रहिवाशांना २५ रुपये शुल्क द्यावे लागत होते. तर ऑनलाइन आधार अपडेट करण्यासाठीही शुल्क आकारले जात होते. पण आता ही प्रक्रिया विनामूल्य करण्यात आली आहे. अशा स्थितीत सरकारच्या या सवलतीचा फायदा आधार कार्डधारक घेऊ शकतात. सरकारच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड गरजेचे आहे. जर अनेक वर्षांपासून तुमचे आधार कार्ड अपडेट केलेले नाही तर तुम्हाला सरकारच्या या निर्णयाचा चांगलाच फायदा होईल. कारण आता आधार अपडेट करणे खूप सोपे झाले असून तुम्ही घरबसल्या देखील UIDAI वेबसाइटवर जाऊन काही मिनिटांत तुमचे आधार अपडेट करू शकता. मात्र, यासाठी तुमचा मोबाईल क्रमांक आधारशी नोंदणीकृत असला पाहिजे. त्यानंतरच तुम्ही या ऑनलाइन सुविधेचा लाभ घेऊ शकता.

अजून बातम्या वाचा..

मनमाड सार्वजनिक वाचनालयाच्या 112 व्या वर्धापन दिना निमित्त “संगणक कक्षाचा शुभारंभ –

मनमाड सार्वजनिक वाचनालयाच्या 112 व्या वर्धापन दिना निमित्त “संगणक कक्षाचा शुभारंभ –

आमदार सुहास कांदेंच्या माध्यमातून वाचनालयाच्या सांस्कृतिक वास्तूचे नूतनीकरण होणार ➖फरहानखान मनमाड...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील मुस्कान चावरिया , आर्या साळुंखे व सुहानी बोरा या महिला खेळाडुंची नंदुरबार जिल्हा संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील मुस्कान चावरिया , आर्या साळुंखे व सुहानी बोरा या महिला खेळाडुंची नंदुरबार जिल्हा संघात निवड

मनमाड- महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत वरिष्ठ महिलांच्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी नंदुरबार...

read more
चैत्र मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवारी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम 🚩

चैत्र मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवारी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम 🚩

मनमाड - मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या...

read more
मनमाड नगर परिषदेचे कोरोनामुळे बाधित मृत कर्मचारी श्री उन्मेश कुलकर्णी यांच्या पत्नी श्रीमती कुलकर्णी यांना आमदार सुहास अण्णा कांदे,नगराध्यक्ष योगेशभाऊ पाटील, मुख्याधिकारी शेषराव चौधरी तसेच सर्व नगरसेवक यांचे उपस्थितीत शासनाकडून प्राप्त र. रु. ५० लक्ष चा धनादेश वितरित करण्यात आला.

मनमाड नगर परिषदेचे कोरोनामुळे बाधित मृत कर्मचारी श्री उन्मेश कुलकर्णी यांच्या पत्नी श्रीमती...

read more
मजुराची आत्महत्या

मजुराची आत्महत्या

नांदगांव :सुमितकुमार जगधने येथील रेल्वे मालधक्क्यावर मजुरीचे काम करून घरी जात असल्याचे सांगून...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीच्या खेळाडूंची नंदुरबार जिल्हासंघाच्या संभावित अंडर 16 खेळांडुमध्ये निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीच्या खेळाडूंची नंदुरबार जिल्हासंघाच्या संभावित अंडर 16 खेळांडुमध्ये निवड

मनमाड - महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी नंदुरबार जिल्ह्य़ातील अंडर 16...

read more
.