loader image

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल मध्ये नाकाद्वारे दिली जाणारी कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध

Mar 18, 2023


नाकाद्वारे देण्यात येणारी करोना प्रतिबंधक लस उपलब्ध 4 थेंबही पुरेसे : पहिला आणि बूस्टर डोस म्हणून हि लस घेता येणार आहे. कोव्हॅक्सिन किंवा कोव्हिशिल्ड ही लस घेतली आहे त्यांना ही नाकाद्वारे हि लस बूस्टर म्हणून घेता येईल.
नाशिक : अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल येथे नाकाद्वारे देण्यात येणारी जगातील पहिली करोना प्रतिबंधक लस उपलब्ध झाली आहे . नाकाद्वारे देता येणारी करोना प्रतिबंधक ( iNCOVACC ) लसीच्या वापराला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने संमती दिली आहे. इन्कोव्हॅक लस भारत बायोटेकने तयार केलेली असून , १८ वर्षे आणि त्यावरील वयाच्या नागरिकांना पहिला आणि बूस्टर डोस म्हणून हि लस घेता येणार आहे. ज्या नागरिकांनी करोनाला प्रतिबंध करणारी कोव्हॅक्सिन किंवा कोव्हिशिल्ड ही लस घेतली आहे त्यांना ही ,नाकाद्वारे देण्यात येणारी लस बूस्टर म्हणून घेता येणार आहे.
नाकावाटे देण्यात येणारी करोना प्रतिबंधक लस कशी आहे?
नाकावाटे देण्यात येणारी करोना प्रतिबंधक लस ही सुई नसलेली आहे.
वेदनारहित लस.
१८ वर्षे वरील नागरिकांना या लसीचे दोन डोस घ्यावे लागणार, तर बुस्टर डोस देखील घेता येईल.
कोव्हॅक्सिन किंवा कोव्हिशिल्ड लसीच्या दोन डोस नंतर सहा महिन्याने बुस्टर डोस म्हणून इन्कोव्हॅकचा डोस घेता येणार आहे.
एक डोस ०.५ एम एल चा असून ८ थेंब ( प्रत्येकी ४ थेंब ) या प्रमाणात नाकावाटे दिले जातात.
ही लस अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल , इंदिरा नगर , नाशिक येथे उपलब्ध आहे. सोमवार ते शनिवार या दिवशी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत उपलब्ध असेल. नागरिक ०४० ६८३३४४५५ या क्रमांकावर संपर्क करून आपली लसीकरणाची वेळ निर्धारित करू शकतात. असे हॉस्पिटल प्रशासनातर्फे कळवण्यात आले आहे.


अजून बातम्या वाचा..

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे 79 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम व भव्य तिरंगा रॅली चेआयोजन युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे 79 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम व भव्य तिरंगा रॅली चेआयोजन युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर मंडलाच्या वतीने स्वतंत्र हिंदुस्थान च्या 79 व्या स्वातंत्र्य दिना...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला....

read more
नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

मनमाड -- नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात...

read more
.