loader image
[ays_poll id=7]

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी औद्योगिक भेट देत अनुभवला प्रत्यक्ष कामकाज

Mar 19, 2023

वर्गात शिकवलेल्या अभ्यासक्रमाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी मनमाड महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागाच्या तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यां नी औद्योगिक भेट दिली.
पदवी अभ्यासक्रमांमध्ये औद्योगिक भेटी हा शैक्षणिक अभ्यासक्रमाचा एक आवश्यक भाग आहे. परस्परसंवादी शिक्षणाचा एक भाग असल्याने, अशा शैक्षणिक भेटी विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमासंबंधित सैद्धांतिक संकल्पनेच्या व्यावहारिक दृष्टीकोनासह वास्तविक कामकाजाच्या वातावरणाचा मोठा परिचय देतात. वरील सर्व बाबींचा विचार करून महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित, कला, विज्ञान व वाणिज्य मनमाड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. व्ही. पाटील, उपप्राचार्य डॉ. जी. एल. शेंडगे व रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. बी. एस. देसले यांच्या मार्गदर्शनाखाली मनमाड महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागाच्या तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांची एक दिवसीय औद्योगिक भेट कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना लि., गौतमनगर, कोळपेवाडी ता. कोपरगाव, जि. अहमदनगर येथे झाली.
या औद्योगिक भेटीत विद्यार्थ्यांनी प्रोसेस ची सुरुवात व त्याचे पूर्ण प्रॉडक्ट्स मध्ये रूपांतर होण्याच्या कार्यप्रणालीचा अभ्यास व निरीक्षण केले. यामध्ये साखर कारखान्याच्या सर्व कर्मचाऱ्यांनी अतिशय उत्कृष्टपणे वेगवेगळ्या विभागांची व प्रोसेसची जसे चोपिंग, मीलिंग, एक्सट्रॅक्शन ऑफ ज्यूस, क्लेरिफिकेशन, कॉन्सन्ट्रेशन ऑफ शुगर केन ज्यूस, क्रिस्टलायझेशन ऑफ शुगर, सेपरेशन, पॅकिंग इत्यादीं बाबत माहिती दिली. या भेटीसाठी कारखान्याचे शिरसाट व प्रवीण निकम यांचे मोलाचे सहकार्य लाभले. रसायनशास्त्र विभागाचे प्रा. रोहित शिंदे, प्रा. अभिजीत बुकाने, प्रा. मिलिंद नागरे, प्रा. निकिता देसले यांच्या सहकार्याने यशस्वीरित्या औद्योगिक भेटीचे आयोजन करण्यात आले. तसेच सदर औद्योगिक भेटीसाठी रसायनशास्त्र विभागाचे डॉ. राहुल शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले.

अजून बातम्या वाचा..

मनमाड – भारतमाता क्रीडा मंडळ आधारस्तंभ व माजी खेळाडू १९९१ महा कुंभमेळा भरतीतील भारतमाता क्रीडा मंडळाचे अष्टपैलू खेळाडू कोठ्यातून भरती झालेले आहे

मनमाड – भारतमाता क्रीडा मंडळ आधारस्तंभ व माजी खेळाडू १९९१ महा कुंभमेळा भरतीतील भारतमाता क्रीडा मंडळाचे अष्टपैलू खेळाडू कोठ्यातून भरती झालेले आहे

श्री मंगेश दराडे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्ती आज पार पडलेल्या पोलिस उपनिरीक्षक पदोन्नती...

read more
मनमाड शहर भाजपा तर्फे 2005 पासून सलग 20 व्या वर्षी भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सर्व क्रांतीवीरांना आदरांजली देणे साठी बुधवार दिनांक 14 ऑगस्ट 2024 रोजी= अखंड भारत दिना =निमित भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

मनमाड - मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सन 2005 पासून भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सर्व ज्ञात अज्ञात...

read more
मनमाड – बुद्धवाडी येथील महामाया महिला मंडळाच्या वर्षावास समितीच्या अध्यक्षपदी अलकबाई पुंडलिक केदारे एकमताने निवड करण्यात आली.

मनमाड – बुद्धवाडी येथील महामाया महिला मंडळाच्या वर्षावास समितीच्या अध्यक्षपदी अलकबाई पुंडलिक केदारे एकमताने निवड करण्यात आली.

कपिल वस्तू बुद्ध विहारात सुरू असलेल्या वर्षावास कार्यक्रमाच्या नियोजनासाठी मावळत्या अध्यक्षा...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालयास “रांगोळी कलात्मक सौंदर्याचा वेध ” हा दुर्मिळ ग्रंथ भेट

मनमाड सार्वजनिक वाचनालयास “रांगोळी कलात्मक सौंदर्याचा वेध ” हा दुर्मिळ ग्रंथ भेट

मनमाड - धार्मिक /सामाजिक कार्यात अथवा कोणत्याही शुभ कार्यात प्रसन्नता येणे साठी रांगोळी काढण्यात...

read more
नांदगाव तालुकास्तरीय कराटे स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडू विजयी

नांदगाव तालुकास्तरीय कराटे स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडू विजयी

मनमाड : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे आयोजित जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
.