loader image
[ays_poll id=7]

पुण्यातील रांका ज्वेलर्स मधील दोन लेखापाल यांनी केली एक कोटी रुपयांची फसवणूक

Mar 20, 2023

पुण्यातील प्रसिद्ध रांका ज्वेलर्स या शोरूम मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनीच मालकाची फसवणूक केली आहे. रांका ज्वेलर्स पेढीतील लेखापालांकडून एक कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणी लेखापाल अमन ओझा, देव नारायण दुबे यांच्या विरुद्ध फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनोळखी व्यक्तीच्या नावाने बील
पुण्यातील रविवार पेठेतील रांका ज्वेलर्सच्या शाखेत 10 सप्टेंबर 2020 ते 7 फेब्रुवारी 2023 या कालावधीत हा प्रकार घडला आहे. अमन ओझा आणि देव नारायण दुबे सराफी पेढीत लेखापाल आहेत. दोघांनी सराफी पेढीचे खाते असलेल्या बँकेच्या धनादेशावर व्यवस्थापकांच्या नावाने बनावट सह्या केल्या. अनोळखी व्यक्तींच्या नावावर त्यांनी बिल तयार केले. त्यानंतर धनादेश अनोळखी व्यक्तीच्या खात्यावर जमा करुन ओझा आणि दुबे यांनी पैसे काढून घेतले. दोघांनी एक कोटीहून अधिक रक्कम काढली. दरम्यान, ओझा आणि दुबे यांनी महिनाभराच्या अंतराने नोकरी ही सोडून दिली

बनावट सही करून फसवणूक
हा सगळा प्रकार लक्षात आल्यानंतर संस्थेच्या व्यवस्थापकांना शंका आली. त्यांनी धनादेशाची पाहणी केली असता धनादेशावर देशपांडे नामक यांची बनावट सही असल्याचे आढळून आले. त्यानंतर देशपांडे यांनी गेल्या दोन वर्षातील हिशोब तपासला. त्या वेळी दोघांनी देशपांडे यांची बनावट सही करुन फसवणूक केल्याचे उघडकीस आले. यानंतर देशपांडे यांनी पोलिसात धाव घेतली. पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.
पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहे. रांका ज्वेलर्सच्या एक कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची घटना समोर येताच मोठी खळबळ उडाली आहे पुणे शहरात रांका ज्वेलर्सच्या विविध भागात शाखा आहेत. ही घटना रविवार पेठेतील रांका ज्वेलर्सच्या शाखेत घडली आहे.

अजून बातम्या वाचा..

दोन सुवर्ण पाच रौप्यपदकासह राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाड च्या खेळाडूंची चमकदार कामगिरी पूजा परदेशी आनंदी सांगळे ला सुवर्णपदक

दोन सुवर्ण पाच रौप्यपदकासह राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाड च्या खेळाडूंची चमकदार कामगिरी पूजा परदेशी आनंदी सांगळे ला सुवर्णपदक

बारामती येथे १६ ते १८ ऑगस्ट २०२४ दरम्यान संपन्न झालेल्या महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग स्पर्धेत जय...

read more
विद्यार्थ्यांनी सामाजीक मूल्ये जपावीत – डॉ श्री.संजय शांताराम सांगळे,सिद्धी क्लासेस गुणगौरव सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न

विद्यार्थ्यांनी सामाजीक मूल्ये जपावीत – डॉ श्री.संजय शांताराम सांगळे,सिद्धी क्लासेस गुणगौरव सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न

मनमाड - शंभर टक्के निकालाची परंपरा असलेला सिद्धी क्लासेस कॅम्पसचा गुणगौरव सोहळा 2024, 15 ऑगस्ट...

read more
अशोका मेडीकव्हर हॉस्पिटल्सचा आरोग्य व्यावसायिकांच्या समर्थनार्थ देशव्यापी आंदोलनात सहभाग

अशोका मेडीकव्हर हॉस्पिटल्सचा आरोग्य व्यावसायिकांच्या समर्थनार्थ देशव्यापी आंदोलनात सहभाग

नाशिक, १७ ऑगस्ट – अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्सचा इंडियन मेडिकल असोसिएशन पुकारलेल्या देशव्यापी...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल अँड ज्यु. काॅलेज, मनमाड येथे ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल अँड ज्यु. काॅलेज, मनमाड येथे ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

बातमी : दिनांक: १५/०८/२०२४ . शाळेच्या परंपरेनुसार इयत्ता 10 वी मध्ये शाळेत प्रथम येणा-या...

read more
मनमाड – महामाया महिला मंडळाच्यावतीने बुधलवाडी येथील कपिल वस्तू बुद्ध विहारात भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

मनमाड – महामाया महिला मंडळाच्यावतीने बुधलवाडी येथील कपिल वस्तू बुद्ध विहारात भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महामाया महिला मंडळाच्या अध्यक्षा अलकबाई केदारे होत्या. प्रारंभी...

read more
.