loader image
[ays_poll id=7]

मनमाड सार्वजनिक वाचनालयाने मराठी नववर्ष निमित्ताने उभारली मराठी पुस्तकांची गुढी

Mar 22, 2023


मनमाड शहाराच्या साहित्य ,सांस्कृतिक, सामाजिक,शैक्षणिक,क्षेत्रात मानाचे स्थान असणाऱ्या आणि व्रत अखंड वाचक सेवेचे हे ब्रीद वाक्य घेऊन 109 वर्षाची शतकोत्तर वाटचाल करणाऱ्या मनमाड सार्वजनिक वाचनालय ने वाचन संस्कृती ला जोपसण्यासाठी यंदा चैत्र शुद्ध प्रतिपदा मराठी नववर्ष म्हणजेच गुढीपाडवा निमित्ताने गुढी पुस्तकां – गुढी विचारांची या अभिनव कार्यक्रमा अंतर्गत अभिनव संकल्पनेतून मराठी पुस्तकांची गुढी उभारली मराठी नववर्षा निमित्ताने या पुस्तकांच्या गुढी मध्ये अत्यंत कल्पकतेने गुढी काठी म्हणून चार वेद (यजुर्वेद ऋग्वेद,सामवेद, अथर्व वेद )भगवत गीता, श्री रामायण,श्री ज्ञानेश्वरी, महाभारत, नवनाथ ग्रंथ, श्री दासबोध,एकनाथी भागवत, गुरु गीता, श्री गुरु चरित्र या पारंपरिक धर्म ग्रंथ, तसेच छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप यांचे ऐतिहासिक ग्रंथ,भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर लिखित भारतीय संविधान यांचे सह सामाजिक,शैक्षणिक, सह सर्वच विषया च्या पुस्तकाचा वापर करण्यात आला तसेच नवीन पिढीला वाचनाची आवड लागावी म्हणून वाचन प्रबोधन करणारी विविध घोष वाक्य ही लिहिण्यात आली होती या कार्यक्रमा ला मनमाड सार्वजनिक वाचनालय चे अध्यक्ष नितीन पांडे, सचिव कल्पेश बेदमुथा, जेष्ठ संचालक नरेश गुजराथी, माजी अध्यक्ष सुरेश शिंदे,संचालक प्रज्ञेष खांदाट,प्रसिद्ध लेखक कवी वक्ते संदीप देशपांडे सर, भिकचंद नाबेडा सर, नीलकंठ त्रिभुवन अक्षय सानप,आदी मान्यवर उपस्थित होते सर्व प्रथम पुस्तक रुपी गुढी चे व माता सरस्वती च्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन मान्यवराच्या हस्ते करण्यात आले. सध्या वाचन संस्कृती वर सोशल मीडियाचे मोठे आक्रमण झाले आहे म्हणून वाचन चळवळ जिवंत ठेवणे साठी या मराठी पुस्तकांची गुढी हा अभिनव उपक्रम वाचनालयाने केला असे आपले प्रास्ताविक मध्ये वाचनालयाचे अध्यक्ष नितीन पांडे यांनी सांगितले तर या पुस्तकं रुपी गुढी तील एक एक पुस्तक नक्कीच नवीन वाचकांना वाचनाची प्रेरणा देणारे ठरतील असे नरेश गुजराथी यांनी सांगितले तर कवी संदीप देशपांडे यांनी मराठी भाषा व वाचन संस्कृती यावर उत्तम कविता सादर करीत या उपक्रमा ला शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाचनालया चे सचिव कल्पेश बेदमुथा यांनी केले मनमाड सार्वजनिक वाचनालय च्या ग्रंथपाल सौ संध्या गुजराथी, हेमंत मटकर, सौ नंदिनी फुलभाटी, मच्छिन्द्र साळी आदी सह वाचक मोठया संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे संयोजन मनमाड सार्वजनिक वाचनालया चे अध्यक्ष नितीन पांडे व सचिव कल्पेश बेदमुथा यांनी केले सध्या च्या सोशल मीडिया च्या वेगवान काळात ही मराठी पुस्तकांची गुढी सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे.


अजून बातम्या वाचा..

रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक तर्फे मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर अनकाई येथे संपन्न

रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक तर्फे मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर अनकाई येथे संपन्न

  दिनांक 17 मंगळवार रोजी अनकाई येथे रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक आणि रोटरी आय हॉस्पिटल मालेगाव...

read more
महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड, ता. नांदगाव,जि. नाशिक महाविद्यालयास ‘स्वायत्त दर्जा’ प्रदान

महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड, ता. नांदगाव,जि. नाशिक महाविद्यालयास ‘स्वायत्त दर्जा’ प्रदान

  मनमाड :- महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड,...

read more
व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक, अनिल पारीक आणि द्वारकेश पारीक ह्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी मनमाड बंद

व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक, अनिल पारीक आणि द्वारकेश पारीक ह्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी मनमाड बंद

मनमाड -- मनमाड शहर व्यापारी महासंघ चे अध्यक्ष राजाभाऊ पारीक तसेच त्यांचे लहान बंधू अनिल पारीक व...

read more
एक दिवशीय जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत महामानव फॉउंडेशन,मालेगाव संघ विजेता.

एक दिवशीय जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत महामानव फॉउंडेशन,मालेगाव संघ विजेता.

  मनमाड:-एम.एस.स्पोर्ट्स,मनमाड आयोजित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रेल्वे क्रिडांगण,मनमाड...

read more
.