loader image
[ays_poll id=7]

अंकाई रेल्वे मालधक्क्यावर औष्णिक विद्युत केंद्रातून येणाऱ्या राखेमुळे शेतकरी व कांदा लोडींग करणाऱ्या व्यापाऱ्याचें मोठे नुकसान

Mar 23, 2023


नांदगाव सोमनाथ घोंगाणे

मनमाड जवळ असलेल्या अंकाई रेल्वे स्थानकावर मालधक्क्यावर औष्णिक विद्युत केंद्रातील राख मालवाहतूक गाडीतून आणली जाते. प्लॅटफॉमवर खाली होते, नंतर ती तेथून अन्यत्र ट्रक द्रवारे नेली जाते.मात्र गाडीतून राख उतरविल्यानंतर ती मोठ्या प्रमाणावर हवेने उडत असल्याने परिसरातील शेतक-यांच्या पिकांचे नुकसान होते. राखेमुळे या भागातील नागरिकांना जगणे मुश्किल झाले होते. या ठिकाणी कांद्याची लोडिंग होत असल्याने राखेमुळे कांद्याच्या प्रतवारी परिणाम होत असल्याच्या तक्रारी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्याकडे दाखल होताच त्यांनी तात्काळ त्याची गंभीर दखल घेत, स्वीय सहाय्यक प्रवीण रौदळ यांना तातडीने घटनास्थळी जाऊन पाहणी करण्याचे आदेश दिले. व रेल्वे विभागाशी बोलून अधिकाऱ्यांनाही घटनास्थळी उपस्थित राहण्याचे आदेश दिले. त्यानुसार रौदळ यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तसेच रेल्वेचे अधिकारी , ग्रामस्थ व व्यापारी वर्गाची संयुक्त बैठक घेऊन कैफियत जाणून घेतली. या बैठकीचा अहवाल केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना सादर करणार असून लवकरच मंत्री डॉ. भारती पवार रेल्वेच्या वरिष्ठ अधिकारी व रेल्वेमंत्री यांच्याशी संपर्क साधून अंनकाई किल्ल्या रेल्वे स्थानकावर राख न उत्तरविण्याबाबत सूचना करणार आहे. यावेळी डॉ.भारती पवार यांचे स्वीय सहायक प्रविण रौदळ , कारटींगएजंट संजय वडनेरे, कांदा व्यापारी सुनील देवरे, सुशील संकलेचा,भाजप नांदगाव तालुकाध्यक्ष गणेश शिंदे, रेल्वे वाणिज्य विभागाचे बी.एल.मीना, श्री. कुंभार , ग्रामस्थ अलकेश कासलीवाल, तुषार आहिरे,बाळासाहेब बोराडे, जिवृत्ती घुमरे, अशोक घुमरे, कृष्णा घुमरे,रमेश घुमरे, किशोर बोराडे, बाळू घुमरे, ज्ञानेश्वर घुमरे, उत्तम घुमरे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

लायन्स क्लब ऑफ मनमाड प्राइड व लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये कर्करोग (कॅन्सर) जनजागृती कार्यक्रम संपन्न.

लायन्स क्लब ऑफ मनमाड प्राइड व लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये कर्करोग (कॅन्सर) जनजागृती कार्यक्रम संपन्न.

  मनमाड :-लायन्स क्लब ऑफ मनमाड प्राइड,लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटी व कॅन्सर सेंटर अमेरिका (CCA)...

read more
मनमाड महाविद्यालयाच्या रासेयो स्वयंसेवकांची जिल्हास्तरीय विविध स्पर्धे मध्ये यश

मनमाड महाविद्यालयाच्या रासेयो स्वयंसेवकांची जिल्हास्तरीय विविध स्पर्धे मध्ये यश

मनमाड महाविद्यालयाच्या रासेयो स्वयंसेवकांची जिल्हास्तरीय विविध स्पर्धे मध्ये यश महात्मा गांधी...

read more
भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे एक पेड माँ के नाम या उपक्रमा अंतर्गत फुलवाणी नगर मध्ये 105 वृक्षा चे रोपण

भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे एक पेड माँ के नाम या उपक्रमा अंतर्गत फुलवाणी नगर मध्ये 105 वृक्षा चे रोपण

भारतीय जनता पक्ष राजकारण करीत असताना सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजपयोगी उपक्रम राबवित असते याच...

read more
.