बिहार राज्यातील मजूर अमर रामकृष्ण वय 29 वर्ष, धंदा- मजुरी, रा.मु.पो.बलेख जि. खागरिया राज्य बिहार तसेच इतर १० मजूर दि. 10/03/2023 रोजी ट्रेन नं 12150 दानापुर पुणे एक्सप्रेसने जनरल बोगीतून पुणे येथे जात असताना रात्री 22.15 ते 22.47 वा चे दरम्यान रेल्वे स्टेशन मनमाड ते कोपरगांव दरम्यान धावत्या गाडीत पाच ते सहा इसमांनी त्यांना हाथाबुक्क्यांनी मारहाण करुन ऑपरेशन करण्याचे ब्लेडपान दाखवुन धमकी देवुन त्यांचे कडील वेगवेगळ्या कंपनीचे एकुण १० मोबाईल, रोख, सोन्याचे पॅन्डल, चांदीची चैन, ब्रेसलेट, असा एकुण 1,49,900/ रु. चा माल त्यांना हाथाबुक्क्यांनी मारहाण करुन धमकावुन जबरदस्तीने काढुन घेवुन रेल्वे स्टेशन कोपरगांव येथे गाडीचे आउटसाईडने उतरुन पळुन गेले. फिर्याद व सहफिर्यादी यांनी दिलेल्यां सविस्तर फिर्याद वरुन गु.र.नं.१८४/२०२३ कलम ३९५,४१२,३४ भा.द.वि. गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
आरोपींचा कसोशीने
तपासामध्ये मा. पोलीस अधिक्षक सो. श्री गणेश शिंदे सो. यांचे मार्गदर्शनाखाली विविध तपास पथके करुन व बारकाईने कोपरगांव, शिर्डी, मनमाड तयार येवला, जळगांव, औरंगाबाद, नाशिक, ठाणे इ. ठिकाणी मिळालेले सीसीटीव्ही व तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपींचा शोध घेत असताना गुन्हा करण्याच्या पध्दतीनुसार आरोपी शिर्डी, मनमाड, कोपरगांव परिसरात परत येण्याच्या शक्यतेवरून व त्यांचे बोलीभाषेवरुन शिर्डी येथे सापळा लावुन आरोपींना ताब्यात घेण्यात आले. आरोपी नामे १) केशव होनाळे वय २१ वर्ष औरंगाबाद २) यशराज उर्फ बंटी सातदिवे औरंगाबाद ३) अक्षय सावंत वय २१ वर्ष रा. पुणे ( फिरस्ता ) ४) प्रदिप पांचाळ वय २० वर्ष रा. परभणी ५) प्रदिप शिंगटे वय २२ वर्ष रा. अहमदनगर असे दि. १८/३/२०२३ रोजी अटक करण्यात आले. आरोपींनी दरोड्याच्या गुन्हयातील मुद्देमाल हा अल्ताफ शेख वय ४५ वर्ष रा. शिर्डी व सिराज पटेल वय २६ वर्ष रा. मनमाड यांनी घेतलेला होता. तपासात आरोपींकडुन चांदीची चैन, ब्रेसलेट, पदक, पॅन्डल, वेगवेगळ्या कंपनीचे ८ मोबाईल, रोख रुपये असा एकुण 1,11,370 रुपयांचा चा ऐवज हस्तगत करण्यात आलेला आहे. आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास चालू आहे.

गुन्हयाच्या तपास लोहमार्ग औरंगाबाद मा. पोलीस अधिक्षक श्री. गणेश शिंदे व मा. उप विभागीय पोलीस अधिकारी लोहमार्ग मनमाड श्री. दिपक काजवे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक एस.बी.जोगदंड सपोनि एस.एस. वाघमोडे, एएसआय दिनेश पवार, हेमराज आबेंकर, पो.ना.महेंद्रसिंग पाटील, संतोष भालेराव, राहुल राजगीरे, किशोर कांडीले, राज बच्छाव, राजेश जाधव, सुशिल भावसार, अमित पातोडे, अमोल खोडके, किरण व्हंडे, प्रेम सलोटे, विलास डोंगरे तसेच RPF नाशिक CPDS टिम चे उपनिरि रविंद्र कुमार, RPF कॉन्स्टेबल सागर वर्मा, मनिषकुमार, दिपक सानप RPF शिर्डी सहाउपनिरि केतन पारखे, RPF कॉन्स्टेबल कचरे यांनी कामगीरी केलेली आहे.










