loader image
[ays_poll id=7]

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान अंतर्गत नांदगाव शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पास प्रशासकीय मान्यता..

Mar 24, 2023


आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले असून नांदगाव शहरासाठी गिरणा धरणावरून स्वतंत्र पाणी पुरवठा योजनेला शासनाची मंजुरी मिळाली आहे. गिरणा धरण ते नांदगाव शहर पाणी पुरवठा योजनेमुळे शहरवासीयांची पाणी टंचाई दूर होण्यास मदत होणार आहे.
पुढील वीस वर्षांपर्यंतची वाढती लोकसंख्या विचारात घेवून पाण्याचे आरक्षण करण्यात आलेले आहे.
गिरणा धरणाच्या उदभव क्षेत्रात एक कोटी 49 लाख रुपये खर्चाची 25 फूट व्यासाची जॅकलीन, पाण्याचा उपसा करण्यासाठी दीड कोटी खर्चाच्या 225 अश्व शक्तीचे विद्युत पंप,
गिरणा धरणापासून ते नांदगांव ग्रामीण रुग्णालया मागील नियोजित जलशुद्धीकरण केंद्रा पर्यंत एक फूट दोन इंच व्यासाची एकूण साडे 28 किलोमीटर लांबीची १९ कोटी 97 लाख 60 हजार रुपये खर्चाची मुख्य जलवाहिनी,
दररोज साठ लाख लिटर पाणी शुद्धीकरण करण्यासाठी ३ कोटी ७८ लाखांचे जलशुद्धीकरण केंद्र,
शुद्धीकरण झालेले पाणी शहरात वितरणासाठी शहराअंतर्गत ३ किलोमीटर अंतराची जलवाहिनी,
असा या प्रकल्पाचा आराखडा असून हा सर्व प्रकल्प संपूर्णपणे सौरऊर्जेवरचा असल्याने वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे होणारा त्रास कमी होणार आहे.
१ कोटी १५ लाख रुपये खर्चाचे लक्ष्मीनगर व ग्रुपकृपा नगर येहे प्रत्येकी चार लाख लिटर क्षमतेचे जलकुंभ उभारण्यात येणार आहेत.
आमदार सुहास अण्णा कांदे यांनी पहिल्या दिवसापासूनच मतदार संघातील पाणी प्रश्न मार्गी लावण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले आहेत आणि यामध्ये मोठे यशही मिळवले आहे.
मनमाड शहरासाठी हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे करंजवण मनमाड पाणीपुरवठा योजना, धर्मवीर आनंद दिघे 78 खेडी पाणी पुरवठा योजना, दहिवाळ सह 26 गाव पाणी पुरवठा योजना या योजना आधीच मार्गी लागल्या असून यांचे काम सुरू झाले आहे.
आता नांदगाव शहरासाठी स्वतंत्र पाणी योजना मंजूर झाली असून लवकरच ही योजना पूर्ण होणार आहे या अनुषंगाने आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून नांदगाव विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावाचा पाणी प्रश्न भविष्यात सुटण्यास मदत होणार आहे.
मनमाड नांदगाव शहरा सोबतच नांदगाव विधानसभा मतदारसंघातील गावागावात या योजनांमुळे पाणी येणार असून गावातील नागरिक, माता भगिनींमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहेत.


अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ-नांदगाव छत्रपती संभाजीनगर रोडवर गंगाधरी येथे एस. टी बस अल्टोगाडी च्या अपघातात तीन मुत्यूमुखी

बघा व्हिडिओ-नांदगाव छत्रपती संभाजीनगर रोडवर गंगाधरी येथे एस. टी बस अल्टोगाडी च्या अपघातात तीन मुत्यूमुखी

  नांदगाव सोमनाथ घोंगाणे नांदगाव शहरातील गंगाधरी गावाजवळ एस. टी . बस व अल्टो कारच्या अपघातात...

read more
शांतीब्रम्ह एकनाथ महाराज चतुर्थ शतकोत्तर रौप्य महोत्सवाची काल्याच्या किर्तनाने सांगता

शांतीब्रम्ह एकनाथ महाराज चतुर्थ शतकोत्तर रौप्य महोत्सवाची काल्याच्या किर्तनाने सांगता

मनमाड : योगेश म्हस्के शांतीब्रम्ह एकनाथ महाराज चतुर्थ शतकोत्तर रौप्य महोत्सवा निमित्ताने आयोजित...

read more
बघा व्हिडिओ-नांदगांव तालुक्यात पावसाने नुकसान झाडे कोलमडली, फळबागांचे नुकसान, पाझर तलावात पाणी साचले, पाणी टंचाई तीव्रता कमी झाली

बघा व्हिडिओ-नांदगांव तालुक्यात पावसाने नुकसान झाडे कोलमडली, फळबागांचे नुकसान, पाझर तलावात पाणी साचले, पाणी टंचाई तीव्रता कमी झाली

  नांदगाव : मारुती जगधने नांदगाव शहर व तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारांच्या मुसळधार पाऊसाचे बे...

read more
मनमाड येथील कीर्तन सोहळ्यात हजारो भाविकांनी घेतला “खीर-मांड्यांचा” आस्वाद ….आज कीर्तन सोहळ्याची सांगता

मनमाड येथील कीर्तन सोहळ्यात हजारो भाविकांनी घेतला “खीर-मांड्यांचा” आस्वाद ….आज कीर्तन सोहळ्याची सांगता

योगेश म्हस्के मनमाड : शांतीब्रम्ह एकनाथ महाराज चतुर्थ शतकोत्तर रौप्य महोत्सवा निमित्ताने आयोजित...

read more
.