एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प (नागरी) नासिक २ अंतर्गत अंगणवाडी केंद्र क्रमांक १० मोरवाडी गाव येथील पोषण पंधरवडा २०२३ अंतर्गत अंगणवाडी सेविका शितल बाविस्कर व मदतनीस जिजाबाई मोरे यांनी स्वस्थ बालकांसाठी उत्सव आयोजित करण्यात आला तसेच बालकांना संपूर्ण अन्नाचे महत्त्व पटवून देण्यात आले कारण पायाभक्कम असला तर त्यावर इमारतही यशस्वी बनते भारताची पुढील पिढी सुदृढ निरोगी व्हावी त्यासाठी सक्षम अंगणवाड्यांची लोकप्रियता वाढवण्यास आम्ही यशस्वी होत आहोत…स्वस्थ बालकांचा हा उत्सवातुन ह एक गोष्ट लक्षात ठेवायचे आहे की बालकांच्या आहारात विविधता ठेवायची आहे,पौष्टीक आहार घ्यायचा आहे.बाहेरील जंक फुड टाळायचे आहे आणि घरातील ताजे अन्नपदार्थ खायचे आहे . सुदृढ पिढी हे देशाचे उज्वल भविष्य आहे.
दोन वर्षांच्या चिमुकलीवर (MICS) पद्धतीने हृदयावर शस्त्रक्रिया यशस्वी
अशोका मेडिकव्हर हास्पिटल येथे बाळाला मिळाले नवजीवन. दोन वर्षांच्या मुलीवर MICS (मिनिमली इनवेसिव्ह...











