loader image
[ays_poll id=7]

बौद्ध वधू-वर पालक परिचय मेळाव्याचे कार्य समाजाला दिशादर्शक : महेंद्रभाऊ (नंदू) गांगुर्डे

Mar 27, 2023


 

पिंपळगांव बसवंत (प्रतिनिधी)
बदलत्या काळात संपर्क माध्यम प्रचंड प्रमाणात उपलब्ध असली तरी आपल्या पाल्याची लग्नगाठ बांधण्याची जबाबदारी अधिक काळजीने हाताळावी लागते त्या करता प्रत्यक्ष भेटी,संवाद, मार्गदर्शन,ओळख परिचय आचार विचार देवाण घेवाण आवश्यक असते या कामी शांतिदुत तथागत बहुउद्देशीय विकास संस्था,नाशिक बौद्ध वधुवर पालक परिचय स्नेह मेळावा अधिक उपयुक्त व गरजेचा असून सातत्याने हा समाजपयोगी उपक्रम सेवाभावी वृत्तीने करून १४१ वा बौद्ध वधू-वर पालक परिचय सभा घेऊन ह्या मेळाव्याचे कार्य समाजाला दिशादर्शक,प्रेरक असल्याचे मत पिंपळगांव बसवंत ग्रामपालिकेचे माजी सरपंच व सामाजिक कार्यकर्ते महेंद्रभाऊ (नंदू) गांगुर्डे यांनी व्यक्त केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थाना वरून ते बोलत होते.

कमीत कमी खर्चात लग्न कार्य करण्याची गरज असून अनाठायी वाह्यात उथळ खर्च भविष्यात टाळण्याची गरज असल्याचे मत अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचे संस्थापक व कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी रवींद्र भाऊ जाधव यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महेंद्र (नंदू) गांगुर्डे हे होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक शांतिदुत तथागत बहुउद्देशीय विकास संस्था,नाशिक बौद्ध वधुवर पालक परिचय स्नेह मेळावा चे संस्थापक निमंत्रक दिनकरराव शेजवळ यांनी केले.प्रमुख अतिथी म्हणून अमोल बागुल,विकास खडताळे,धनंजयशेठ गांगुर्डे (तेली),राजाभाऊ गांगुर्डे, भारत तु. गांगुर्डे,संतोष लोंढे,पांडुरंग पगारे,प्रबुद्ध भा.गांगुर्डे, रमेश भि.जाधव,राजेंद्र साळवे,विजय गांगुर्डे,महेंद्र गायकवाड,जगन्नाथ महिरेसर,रमेश शेजवळ, आदी मान्यवर उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना प्रारंभी अभिवादन करून बौद्धचार्य महेंद्र गायकवाड,माधव शेजवळ यांनी त्रिशरण पंचशील दिले.
भारती महिरे मॅडम,सुभाष हिरे,सुनील हिरे (पहिलवान),बाळासाहेब हिरे,किरण हिरे,हेमंत खडताळे,शाम पगारे,बाळासाहेब गांगुर्डे,बाळू रा. गांगुर्डे, रतन शेजवळ,मधुकर गांगुर्डे गुरुजी,सचिन बर्वे, नानासाहेब गांगुर्डे,अक्षय गांगुर्डे, राजेंद्र अहिरे,राजाभाऊ कटारे यांनी संयोजन केले.
सदर प्रसंगी शांतिदुत तथागत बहुउद्देशीय विकास संस्था,नाशिक बौद्ध वधुवर पालक परिचय स्नेह मेळाव्यास संस्थेचे अध्यक्ष वसंत रोहम, दिनकरराव शेजवळ, माधव शेजवळ,सी.टी. देवकर सर,जे.एन.आहिरे,भाऊसाहेब चव्हाण, आण्णासाहेब खैरे,सप्तसुर वाजंत्री मंडळ यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र गायकवाड, जगन्नाथ महिरे यांनी केले.आभार रमेश शेजवळ यांनी मानले कार्यक्रमास मोठ्या संख्येने विवाह इच्छुक उच्च शिक्षित वधू-वर, पालक उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे कार्यसम्राट आमदार मा.सुहासआण्णा कांदे साहेब यांचा सत्कार.

मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे कार्यसम्राट आमदार मा.सुहासआण्णा कांदे साहेब यांचा सत्कार.

  मनमाड:-आपल्या नांदगाव तालुक्याचे लोकप्रिय,कार्यसम्राट, पाणीदार, क्रीडासम्राट दमदार आमदार...

read more
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

  नांदगाव - आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत देवाज बंगलो नांदगाव येथे राष्ट्रवादी...

read more
नांदगाव तालुक्यात दोन अद्ययावत रुग्णवाहिकांचे आमदार कांदे यांच्या हस्ते लोकार्पण

नांदगाव तालुक्यात दोन अद्ययावत रुग्णवाहिकांचे आमदार कांदे यांच्या हस्ते लोकार्पण

नांदगाव आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या प्रयत्नातून व हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीच्या...

read more
.