loader image
[ays_poll id=7]

म.रा.वि.मं.सूत्रधारी कंपनीच्या संचालकपदी आशिष चंदाराणा यांची नियुक्ती

Mar 27, 2023


मुंबई/नाशिक,दि.२७ मार्च २०२३: राज्याच्या विद्युत क्षेत्रातील अभ्यासू कार्यकर्ते व अकोला येथील विदर्भ चेम्बर्स ऑफ कॉमर्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष श्री आशिष चंदाराणा यांची म.रा.वि.मं. सूत्रधारी कंपनीच्या स्वतंत्र संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती दि. १ एप्रिलपासून लागू होईल. मा. उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सूत्रधारी कंपनीच्या आज झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये श्री चंदाराणा यांच्या नियुक्तीचा निर्णय घेण्यात आला.

श्री चंदाराणा यांनी पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांसाठी वीज क्षेत्राबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी मागील २५ वर्षापासून विविध ठिकाणी कार्यशाळांचे आयोजन केले आहे. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाद्वारे वीजदराबाबत होणाऱ्या अनेक सुनावण्यामध्ये त्यांनी सहभाग घेतला आहे. तसेच मा. आयोगाने त्यांना ग्राहक प्रतिनिधी म्हणून नियुक्त केले होते. त्यांचा वीज क्षेत्राचा विशेष अभ्यास आहे. त्यांनी उद्योग क्षेत्रात केलेल्या कामासाठी त्यांना अकोला जिल्ह्याचा वर्ष २०१२ सालचा सर्वोत्कृष्ट उद्योजक पुरस्कार देख़ील मिळाला आहे.

अकोला येथील रहिवासी असलेले श्री चंदाराणा यांनी वर्ष १९९५ मध्ये अमरावती विद्यापीठातून बी.एस.सी.चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर स्वत:चा व्यवसाय सूरू केला. श्री चंदाराणा हे अमरावती विभागातील लघु उद्योग भारतीचे अध्यक्ष आहेत.

म.रा.वि.मं. सूत्रधारी कंपनीच्या स्वतंत्र संचालकपदी श्री विश्वास पाठक यापूर्वीच कार्यरत असून याखेरीज श्री चंदाराणा यांचीही स्वतंत्र संचालकपदी नियुक्ती करण्याचा निर्णय बैठकीमध्ये घेण्यात आला.


अजून बातम्या वाचा..

मनमाड – बुद्धवाडी येथील महामाया महिला मंडळाच्या वर्षावास समितीच्या अध्यक्षपदी अलकबाई पुंडलिक केदारे एकमताने निवड करण्यात आली.

मनमाड – बुद्धवाडी येथील महामाया महिला मंडळाच्या वर्षावास समितीच्या अध्यक्षपदी अलकबाई पुंडलिक केदारे एकमताने निवड करण्यात आली.

कपिल वस्तू बुद्ध विहारात सुरू असलेल्या वर्षावास कार्यक्रमाच्या नियोजनासाठी मावळत्या अध्यक्षा...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालयास “रांगोळी कलात्मक सौंदर्याचा वेध ” हा दुर्मिळ ग्रंथ भेट

मनमाड सार्वजनिक वाचनालयास “रांगोळी कलात्मक सौंदर्याचा वेध ” हा दुर्मिळ ग्रंथ भेट

मनमाड - धार्मिक /सामाजिक कार्यात अथवा कोणत्याही शुभ कार्यात प्रसन्नता येणे साठी रांगोळी काढण्यात...

read more
नांदगाव तालुकास्तरीय कराटे स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडू विजयी

नांदगाव तालुकास्तरीय कराटे स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडू विजयी

मनमाड : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे आयोजित जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
मनमाड महाविद्यालयाचे श्री विठ्ठल सातपुते शिक्षणशास्त्र विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण

मनमाड महाविद्यालयाचे श्री विठ्ठल सातपुते शिक्षणशास्त्र विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण

मनमाड : येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथील...

read more
.