loader image
[ays_poll id=7]

राष्ट्रीय पोषण पंधरवडा २०२३ चे कालावधीत लाभार्थींसाठी उपयुक्त ठरणाऱ्या अशा दररोज नव्या पाककृती तयार करतात अंगणवाडी सेविका कल्पना ताई जाधव.पालकांकडून या अभिनव उपक्रमाचे होते आहे कौतुक शितल गायकवाड मुख्यसेविका एबाविसेयो प्रकल्प (नागरी) नाशिक-२.

Mar 28, 2023


दिनांक
२० मार्च ते ०३ एप्रिल २०२३सर्वत्र पोषण पंधरवडा साजरा केला जातो आहे..याकालावधीत एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प (नागरी) नाशिक-२ ,प्रकल्प अधिकारी.मा.श्री.वाकडे सर याच्यां मार्गदर्शनाखाली कार्यरत अंगणवाडी केंद्र कार्यक्षेत्रात विविध उपक्रमांचे दैनंदिन वेळापत्रकानुसार आयोजन केले जाते आहे..पोषणाचे वर्तनात बदल घडवून आणणेसाठी लोकसहभाग मिळविला जात आहे..यात विविध थीमवर आधारीत उपक्रम राबवुन सोशल मिडियाचा जास्तीत-जास्त वापर करुन जनजागृती केली जात आहे..या पोषण पंधरवड्याचे औचित्यसाधून लाभार्थींना पोषणासाठी उपयुक्त ठरणारी अशी दररोज एक पाककृती बनवून त्या व्हाट्स अँपग्रुपद्वारे पालकांपर्यंत पोहोचवत आहेत..सदर पाककृती सोशल मिडियावर टाकल्या जात आहेत..जेणेकरुन इतर नागरिकांनाही याचा फायदा व्हावा.कल्पना ताई जाधव या फक्त पाककृतीच तयार करत नसुन त्या पाककृतीची सविस्तर माहिती, त्यासाठी लागणारे साहित्य, पाककृतींचा लाभार्थींना होणारा फायदा याबाबीही त्या सर्वांपर्यंत सोशल मिडियाद्वारे मेसेज करुन पोहोचवत आहेत..यासर्व पाककृती स्थानिक पदार्थ, पालेभाज्या, फळभाज्या वापरुन बनविल्या जाताता..ह्या पाककृतींद्वारे लाभार्थी/पालकांना स्थानिक पदार्थांचा आहारात वापर व उपयोग याबाबीही पटवून दिल्या जात आहे. त्यांच्या या अभिनव उपक्रमाचे पालकवर्गाकडून कौतुक केले जात असल्याची माहिती मुख्यसेविका शितल गायकवाड यांनी दिली..


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड = कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड येथे शिक्षण महर्षी, महात्मा गांधी विद्यामंदिर व...

read more
.