loader image
[ays_poll id=7]

बहुचर्चीत अनाधिकृत टी. पी. सौर्या कंपनीचा सौर उर्जा निर्मितीच्या प्रकल्पास सील

Mar 29, 2023

नांदगाव सोमनाथ घोंगाणे

नांदगाव तालुक्यातील डॉक्टरवाडी-पांझण शिवारातील वनजमिनीवरील टी. पी. सौर ऊर्जा कंपनीच्या प्रकल्पाचे अतिक्रमण मागील दोन महिन्यांपासून गाजत आहे. नाशिकचे विभागीय वनाधिकारी यांनी मंगळवारी (दि.२८) सकाळी वनाधिकारी व १५० वनकर्मचाऱ्यांसह २००पेक्षा पोलिसांचा फौजफाटा घेत डॉक्टरवाडी-पांझण शिवारात धडक दिली. येथील सुमारे २०० कोटी रुपयांचा सौर ऊर्जा प्रकल्पाला वारंवार लेखी सुचना देऊनही काम न थांबवणाऱ्या टी. पी. सौर्या यांचे मौजे डॉक्टरवाडी, बाभूळवाडी सोलर प्रकल्पास भेट देऊन सदर प्रकल्प सील बंद करणेत आला .वनजमिनीवर अतिक्रमण करत व्यावसायिक वापर करणाऱ्या खासगी कंपनीला पहिल्यांदाच वनविभागाने अशाप्रकारे ‘दणका’ दिल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे..
नांदगाव वनपरिक्षेत्रातील डॉक्टरवाडी-पांझण शिवारात असलेल्या वनजमिनीवर टी. पी. सौर्या या कंपनीने सौर ऊर्जानिर्मितीचा प्रकल्प उभा केला आहे. पांझणला वणी दक्षता पथकाने दोन दिवसांपुर्वी छापा टाकून वन कक्ष क्रमांक ४८९ मधील वनजमिनीवर अवैधरित्या उत्खनन करणाऱ्या संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला. तसेच जेसीबी, ट्रॅक्टरदेखील जप्त केले होते. तरीदेखील याठिकाणी प्रकल्प उभारणीचे काम सुरूच असल्याचे लक्षात आल्यानंतर मुख्य वनसंरक्षक नितीन गुदगे यांनी संपुर्ण प्रकल्प सील करण्याचे आदेश विभागीय वनाधिकारी विशाल माळी यांना दिले. माळी यांनी याप्रकरणी नियोजन करत मंगळवारी सकाळी नांदगाव, चांदवड, येवला वनपरिक्षेत्राचे वनाधिकारी कर्मचाऱ्यांसह नाशिक, वणी, अहमदनगरचे वन फिरते पथकांची (दक्षता पथक) अतिरिक्त कुमक व १५० ग्रामिण पोलिसांचा फौजफाटा घेऊन सकाळी दहा वाजता धडक दिली. यावेळी तातडीने सर्व प्रकल्प जप्त करण्याची कारवाई करण्यात आली. सदर प्रकल्पाचे सर्व साहित्य जप्त करून सील करणेत आले. पुढील आदेश होईपावेतो प्रकल्प बंद ठेवणेकामी कंपनीकडून लेखी हमी पत्र घेण्यात आले.
सदर कारवाईत सहाय्यक वनसंरक्षक मनमाड श्री. सुजित नेवसे, वनपरिक्षेत्र अधिकारी नांदगाव (प्रा.) श्री. अक्षय म्हेत्रे, वनपरिक्षेत्र अधिकारी चांदवड (प्रा.) श्री. संजय वाघमारे, दक्षता पथकाचे वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. संजय पवार, श्री. राहूल घरटे व श्री. रविंद्र भोगे तसेच मनमाड उपविभागातील व दक्षता पथकाचे वनपाल, वरक्षक व वनमजूर असे एकूण १०० च्या वर अधिकारी, कर्मचारी सहभागी होते. तसेच निवासी नायब तहसिलदार नांदगाव श्री. चेतन कोनकर व महसूल कर्मचारी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ-भाद्रपद महागणेशोत्सव 2024 निमित्त वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी

बघा व्हिडिओ-भाद्रपद महागणेशोत्सव 2024 निमित्त वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी

छप्पन महाभोग (महानैवेद्य) कार्यक्रमाचे आयोजन संपन्न गणेश भक्तांचा उदंड प्रतिसाद मनमाड - आम्ही...

read more
नाशिक जिल्हा बँकेने ९ कर्जदारांना बजावल्या अंतीम जप्तीच्या नोटीसा; थकबाकीदारांमध्ये भीतीचे वातावरण ?

नाशिक जिल्हा बँकेने ९ कर्जदारांना बजावल्या अंतीम जप्तीच्या नोटीसा; थकबाकीदारांमध्ये भीतीचे वातावरण ?

नांदगाव : मारुती जगधने नांदगांव तालुक्यातील जिल्हा बँकेचे कर्ज घेतलेल्या व थकित झालेल्या ९...

read more
मनमाड महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा… “हिंदी फक्त राष्ट्रभाषाच नव्हे तर विश्व भाषा” – श्री.राजेंद्र जगताप

मनमाड महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा… “हिंदी फक्त राष्ट्रभाषाच नव्हे तर विश्व भाषा” – श्री.राजेंद्र जगताप

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या पदव्युत्तर...

read more
भाद्रपद महागणेशोत्सव ➖2024 निमित्त रविवारी वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी छप्पन महाभोग (महानैवेद्य) व श्री सत्यविनायक महापूजा या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

भाद्रपद महागणेशोत्सव ➖2024 निमित्त रविवारी वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी छप्पन महाभोग (महानैवेद्य) व श्री सत्यविनायक महापूजा या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

मनमाड - आम्ही परंपरा पाळतो... आम्ही संस्कृती चे रक्षण करतो.... हे ब्रीद घेऊन मनमाड शहरात धार्मिक...

read more
मनमाड करांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा तृप्ती पाराशर आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

मनमाड करांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा तृप्ती पाराशर आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

सुवा फिजी येथे १४ ते २१ सप्टेंबर २०१४ रोजी होणाऱ्या कॉमनवेल्थ चँपियनशिप साठी महाराष्ट्रातील एकमेव...

read more
मनमाड शहर भाजपा तर्फे आरक्षण विरोधी राहुल गांधी व हिंदू विरोधी शरद पवार यांचे विरोधात जोरदार घोषणा बाजी करीत निषेध आंदोलन

मनमाड शहर भाजपा तर्फे आरक्षण विरोधी राहुल गांधी व हिंदू विरोधी शरद पवार यांचे विरोधात जोरदार घोषणा बाजी करीत निषेध आंदोलन

राहुल गांधी यांनी अमेरिकेतील एका मुलाखती दरम्यान काँग्रेस भारतात सत्तेत आल्यास आरक्षण काढून टाकू...

read more
कासलीवाल स्कूलमध्ये माता पालकांसाठी कुकिंग बॅटल (कुकिंग विदाऊट फ्लेम्स ) स्पर्धेचे आयोजन…..

कासलीवाल स्कूलमध्ये माता पालकांसाठी कुकिंग बॅटल (कुकिंग विदाऊट फ्लेम्स ) स्पर्धेचे आयोजन…..

नांदगांव : दि १३ मारुती जगधने दि.13 सप्टेंबर 2024 नांदगाव येथील जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडियम...

read more
.