Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

शिर्डीच्या साई मंदिरात रामनवमी उत्सवाला सुरुवात

Mar 29, 2023

शिर्डी येथील साईबाबा मंदिरात साईबाबांची काकड आरती व पोथी मिरवणुकीनंतर धार्मिक कार्यक्रम पार पडणार असून शिर्डीत आजपासून तीन दिवसीय रामनवमी उत्सवाला प्रारंभ झाला आहे. 1911 साली सुरू झालेला रामनवमी उत्सव आजही मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.साईबाबांची काकड आरती व पोथी मिरवणुकीनंतर धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत. पुढील तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून उद्या म्हणजेच रामनवमीच्या मुख्य दिवशी साईमंदिर रात्रभर खुले ठेवण्याचा निर्णय साईबाबा संस्थानने घेतला आहे. राज्यभरातून येणाऱ्या साईभक्तांच्या सुविधेसाठी ठिकठिकाणी मांडव उभारण्यात आले. साईमंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. रामनवमी उत्सवानिमित्त समाधी मंदिर आणि परिसरात आकर्षक फुलांची सजावट करण्‍यात येणार आहे. मुंबई येथील व्‍दारकामाई मंडळाच्‍या वतीने समाधी मंदिर व परिसरात विद्युत रोषणाई व प्रवेशव्‍दारावर काल्‍पनिक भव्‍य देखावा उभारण्‍यात आलाय.

अजून बातम्या वाचा..

शिवस्फुर्ती जिर्णोद्धार सोहळ्यात बहुसंख्येने सहभागी रहावे मराठा महासंघाचे जाहीर आवाहन.!

शिवस्फुर्ती जिर्णोद्धार सोहळ्यात बहुसंख्येने सहभागी रहावे मराठा महासंघाचे जाहीर आवाहन.!

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे तेरावे वंशज आणि राजर्षी शाहू महाराजांच्या...

read more
वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर येवला शहरात पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन 2 तलवारी जप्त

वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर येवला शहरात पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन 2 तलवारी जप्त

दिनांक 11 मार्च रोजी सायंकाळी सात वाजता नाशिक जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांच्या...

read more
उ.प्रदेशातील भाजपचे उमेदवार पंकज सिंह यांचा विजय अन् महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीतील विक्रमाची चर्चा होत आहे

उ.प्रदेशातील भाजपचे उमेदवार पंकज सिंह यांचा विजय अन् महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीतील विक्रमाची चर्चा होत आहे

उत्तर प्रदेशातील भाजपचे उमेदवार पंकज सिंह यांचा विजय अन् महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]