Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

शिर्डीच्या साई मंदिरात रामनवमी उत्सवाला सुरुवात

Mar 29, 2023

शिर्डी येथील साईबाबा मंदिरात साईबाबांची काकड आरती व पोथी मिरवणुकीनंतर धार्मिक कार्यक्रम पार पडणार असून शिर्डीत आजपासून तीन दिवसीय रामनवमी उत्सवाला प्रारंभ झाला आहे. 1911 साली सुरू झालेला रामनवमी उत्सव आजही मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.साईबाबांची काकड आरती व पोथी मिरवणुकीनंतर धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत. पुढील तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून उद्या म्हणजेच रामनवमीच्या मुख्य दिवशी साईमंदिर रात्रभर खुले ठेवण्याचा निर्णय साईबाबा संस्थानने घेतला आहे. राज्यभरातून येणाऱ्या साईभक्तांच्या सुविधेसाठी ठिकठिकाणी मांडव उभारण्यात आले. साईमंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. रामनवमी उत्सवानिमित्त समाधी मंदिर आणि परिसरात आकर्षक फुलांची सजावट करण्‍यात येणार आहे. मुंबई येथील व्‍दारकामाई मंडळाच्‍या वतीने समाधी मंदिर व परिसरात विद्युत रोषणाई व प्रवेशव्‍दारावर काल्‍पनिक भव्‍य देखावा उभारण्‍यात आलाय.

अजून बातम्या वाचा..

मराठी राज्यभाषा दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनमाड शहर शाखेच्या वतीने मराठी व्याख्यानमाला

मराठी राज्यभाषा दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनमाड शहर शाखेच्या वतीने मराठी व्याख्यानमाला

दिनांक 27 फेब्रुवारी मराठी राज्यभाषा दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनमाड शहर शाखेच्या...

read more
सकल मराठा समाज व शिवभक्त याच्या तर्फे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवजयंती उत्साहात साजरी

सकल मराठा समाज व शिवभक्त याच्या तर्फे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवजयंती उत्साहात साजरी

शिवजन्मोस्तव निमित्त 18 तारखेला मानवीय मूल्य जोपासत रक्तदान शिबीर घेण्यात आले.मालेगाव ब्लड बँक...

read more
मराठा आरक्षण व समाजाच्या विविध मागण्यांसाठी मनमाड शहरात मराठा क्रांती मोर्चा व अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे आंदोलन

मराठा आरक्षण व समाजाच्या विविध मागण्यांसाठी मनमाड शहरात मराठा क्रांती मोर्चा व अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे आंदोलन

मराठा आरक्षण व समाजाच्या विविध मागण्यांसाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सुरू केलेल्या उपोषणाला...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]