Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मराठा आरक्षण व समाजाच्या विविध मागण्यांसाठी मनमाड शहरात मराठा क्रांती मोर्चा व अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे आंदोलन

Feb 26, 2022

मराठा आरक्षण व समाजाच्या विविध मागण्यांसाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सुरू केलेल्या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी मनमाड शहरात मराठा क्रांती मोर्चा व अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे जोरदार निर्दशने करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरला अभिवादन करून आंदोलनाला सुरवात करण्यात आली. मराठा आरक्षण प्रश्नी केंद्र व राज्य सरकारने मराठा समाजच्या तोंडाला पाने पुसल्याचा आरोप करीत संतप्त आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघ जिल्हाध्यक्ष उल्हास राव देशमुख यांनी सांगितले ओ.बी.सी. मधून मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे शासन सेवेत निवड झालेल्या उमेदवारांना तत्काळ नियुक्ती देऊन शासन सेवेत रुजू करून घ्यावे. सारथी या संस्थेची कार्यालय प्रत्येक महसुली विभागात सुरू करण्यात यावी. कै. अण्णा साहेब पाटील महामंडळला आवश्यक पुरेसा निधी देण्यात यावा. डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्यात वाढ करण्यात यावी महिलांची संख्याही लक्षणीय होती. मराठा आरक्षण व समाजाच्या प्रलंबित मागण्या त्वरित मान्य कराव्या अन्यथा पुढे निवडणुकांवर बहिष्कार टाकून आंदोलन तीव्र करण्याची इशारा आंदोलकांनी दिला. यावेळी भिमराज लोखंडे ,विष्णू चव्हाण, विनोद डमरे, रवींद्र ताठे, नाना घुमरे वैभव जाधव, सुरेखा धुमाळ, सुरेखा झाल्टे ,संध्या गवळे ,सुवर्णा निकम ,प्रतिभा चव्हाण ,लक्ष्मी लोखंडे हेमंत गवळे, विकास गंगाराम करकाळे ,उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

महिलेच्या गळ्यातील पोत ओरबाडून चोरटे पसार; शहरातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण

महिलेच्या गळ्यातील पोत ओरबाडून चोरटे पसार; शहरातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण

मनमाड- शहरातील अत्यंत गजबजलेल्या विवेकानंद नगर दोन परिसरात राहणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]