Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

शिर्डीच्या साई मंदिरात रामनवमी उत्सवाला सुरुवात

Mar 29, 2023

शिर्डी येथील साईबाबा मंदिरात साईबाबांची काकड आरती व पोथी मिरवणुकीनंतर धार्मिक कार्यक्रम पार पडणार असून शिर्डीत आजपासून तीन दिवसीय रामनवमी उत्सवाला प्रारंभ झाला आहे. 1911 साली सुरू झालेला रामनवमी उत्सव आजही मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.साईबाबांची काकड आरती व पोथी मिरवणुकीनंतर धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत. पुढील तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून उद्या म्हणजेच रामनवमीच्या मुख्य दिवशी साईमंदिर रात्रभर खुले ठेवण्याचा निर्णय साईबाबा संस्थानने घेतला आहे. राज्यभरातून येणाऱ्या साईभक्तांच्या सुविधेसाठी ठिकठिकाणी मांडव उभारण्यात आले. साईमंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. रामनवमी उत्सवानिमित्त समाधी मंदिर आणि परिसरात आकर्षक फुलांची सजावट करण्‍यात येणार आहे. मुंबई येथील व्‍दारकामाई मंडळाच्‍या वतीने समाधी मंदिर व परिसरात विद्युत रोषणाई व प्रवेशव्‍दारावर काल्‍पनिक भव्‍य देखावा उभारण्‍यात आलाय.

अजून बातम्या वाचा..

मनमाड शहरात कोरोना प्रतिबंधक नियमांची कडक अंमलबजावणी करावी-मनमाड भाजपाची मागणी

मनमाड शहरात कोरोना प्रतिबंधक नियमांची कडक अंमलबजावणी करावी-मनमाड भाजपाची मागणी

आज मनमाड शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या इंडियन हायस्कूल मधील एक शिक्षक कोरोना ग्रस्त आढळून आला...

read more

आ. सुहास कांदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासाठी आमदार निधी २० लक्ष रुपये मंजूर.

आमदार कांदे यांच्या आमदार निधीतून छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या नूतनीकरणाला २० लाख मंजूर...

read more

पुन्हा मेगाब्लॉक !

गेल्या आठवड्यात मुंबई पाठोपाठ नांदगाव रेल्वे स्थानकात घेण्यात आलेल्या ब्लॉकमुळे रेल्वे गाड्यांचा...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]