loader image
[ays_poll id=7]

पुन्हा मेगाब्लॉक !

Jan 1, 2022


गेल्या आठवड्यात मुंबई पाठोपाठ नांदगाव रेल्वे स्थानकात घेण्यात आलेल्या ब्लॉकमुळे रेल्वे गाड्यांचा मोठ्या प्रमाणावर खोळंबा झाला तर पंचवटी , जनशताब्दीसह अनेक गाड्या रद्द कराव्या लागल्या . त्यात आता पुन्हा नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी मोठ्या मेगाब्लॉकची भर पडली आहे . १ जानेवारी २०२२ ते ९ जानेवारी दरम्यान मुंबईत कळवा – दिवा दरम्यान रेल्वेच्या तांत्रिक कामासाठी पुन्हा मोठा मेगा ब्लॉक घेण्यात आल्याने जवळपास २० महत्वपूर्ण प्रवासी रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत . त्यात नाशिक जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेल्या मनमाड – मुंबई पंचवटी एक्सप्रेससह तपोवन , जनशताब्दी या महत्वाच्या गाड्यांचा समावेश आहे . 

             पुढील आठवड्यात मध्य रेल्वेच्या १८ महत्वाच्या प्रवासी रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याची माहिती रेल्वेने प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली . विशेष म्हणजे या सर्व गाड्या भुसावळ विभागातून मनमाड नाशिक मार्गे जाणाऱ्या आणि येणाऱ्या गाड्या आहेत. रेल्वे प्रवास अजून पूर्ण क्षमतेने सुरू झालेला नाही . त्यातच गेल्या ५३ दिवसांपासून एस.टी. कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे . त्यामुळे ग्रामीण आणि निमशहरी भागातील प्रवाशांची प्रवास करण्यासाठी मोठी ओढाताण होत आहे . त्यात या मेगाब्लॉकची भर पडली . रेल्वे प्रशासनाने पुढील गाड्या रद्द करण्यात येत असल्याचे जाहिर केले .

गाडी रद्द असल्याची दिनांक 

गाडी क्र.१२०७१-१२०७२ मुंबई – जालना जनशताब्दी अप डाऊन ( शनिवार दि .८ व रविवार दि . ९ ) ,

१२११०-१२१०९ मनमाड मुंबई – मनमाड पंचवटी अप आणि डाऊन ( शनिवार दि .८ व रविवार दि . ९ ) ,

११४०१-११४०२ मुंबई- अदिलाबाद – मुंबई नंदीग्राम एक्सप्रेस ( शनिवार दि .८ , रविवार दि . ९ आणि सोमवार दि .१० ) ,

गाडी क्र.१२१४०-१२१३९ नागपूर – मुंबई – नागपूर सेवाग्राम एक्सप्रेस अप डाऊन ( शुक्रवार दि . ७ , शनिवार दि .८ , रविवार दि . ९ , सोमवार दि . १० ) ,

गाडी क्र .१११३ ९ -१११४० मुंबई – गदग मुंबई एक्सप्रेस ( शनिवार दि .८ . रविवार दि . ९ , सोमवार दि . १० ) ,

१७६११-१७६१२ नांदेड – मुंबई नांदेड तपोवन एक्सप्रेस ( शुक्रवार दि .७ शनिवार दि .८ , रविवार दि . ९ ) रोजी रद्द करण्यात आलेल्या आहेत .

तर १२०७१-१२०७२ जालना – मुंबई – जालना अप – डाऊन जनशताब्दी एक्सप्रेस ( दि . २ जानेवारी रद्द ) ,

गाडी क्र . १२११०-१२१०९ मनमाड – मुंबई – मनमाड पंचवटी एक्सप्रेस ( दि . २ जानेवारी रद्द ) ,

गाडी क्र . ११४०१- ११४०२ मुंबई – अदिलाबाद – मुंबई नंदीग्राम एक्सप्रेस ( दि .२ व ३ जानेवारी रद्द ) ,

गाडी क्र . १२१४०-१२१३९ नागपूर मुंबई – नागपूर सेवाग्राम एक्सप्रेस ( दि . १ व २ जानेवारी रद्द ) ,

गाडी क्र.१७६११-१७६१२ नांदेड – मुंबई – नांदेड तपोवन एक्सप्रेस ( दि .१ व २ जानेवारी रद्द करण्यात आली आहे .

भुसावळ विभागातून धावणाऱ्या या गाड्या रद्द करण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाने कळविले आहे.


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक अनिश्चित कालावधीसाठी प्रलंबित राहण्याची शक्यता

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक अनिश्चित कालावधीसाठी प्रलंबित राहण्याची शक्यता

राज्यातील 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलंडलेल्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका घेण्यास सुप्रीम...

read more
.