loader image
[ays_poll id=7]

शहरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांचे निवारण करण्याची फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचारमंच तर्फे नगरपरिषद प्रशासनाकडे मागणी

Mar 31, 2023


शहरात मोकाट जनावरांचा सुळसुळाट झालेला असुन अपघाताचे प्रमाण वाढले आहे व रस्त्याने जाणे येणे वयोवृध्द व लहान मुलांना भितीयुक्त वातावरण झाल्याने जनावरांचा व मोकाट कुत्र्यांचा त्वरीत बंदोबस्त करून लोकांच्या जिवाला संरक्षण द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे.
ब-याच ठिकाणी रस्त्यांचे काँक्रीटीकरण केल्याने दुचाकी गाडया भरधाव वेगाने धावत आहेत व त्यामुळे अपघाताचे प्रमाणे वाढलेले आहे. लोकांच्या जिवीताला धोका निर्माण झालेला आहे. मोक्याच्या ठिकाणी तसेच चौकाचौकात रेडीमेड स्पिड ब्रेकर बसवुन वाहतुक सुरळीत करावी
तसेच शहरात प्रमुख ठिकाणी सी.सी.टी.व्ही. कॅमेरे लावून अपघात तसेच चोरी व अन्य गुन्हेगारी संबधा योग्य त्या फुटेजवरुन अचुक महिती मिळून नागरीकांच्या सुविधेत मोलाची भर घालता येईल.
मालेगाव नाका, पेट्रोलपंप समोरील चौफुलीस माजी राष्ट्रपती दिवंगत डॉ.श्री. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या नावाचा मोठा पथदर्शक
फलक लावावा तसेच पाकीजा चौक एफसीआय रोडकडे जा
रस्ता येथे शहीद अ. हमीद रोड दर्शक स्पष्ट व आकर्षक फलक
लावण्यात यावेत.
ब-याच वर्षांपासून सावित्रीबाई फुले मंडई अत्यन्त दयनीय व अस्वच्छ अवस्थेत असल्याने त्याबाबत लवकरात लवकर स्वच्छता करुन लोकांसाठी उपयोगात आणावे.
आय.यु.डी.पी येथील पंधरकर यांच्या घरासमोरील मैदानात उद्यान तयार करून ज्येष्ठ नागरीक व बालकांसाठी योग्य सुविधा उपलब्ध करुन देउन सदरच्या प्रस्तावित उद्यानाला राजमाता जिजाउ उद्यान असे नाव द्यावे.

दिनांक ३०.०९.२०२२ रोजीच्या आमच्या पत्रान्वये ज्या ज्या ठिकाणीचे स्ट्रीट लाईट बंद झाले आहेत ते सर्व त्वरीत चालु करण्याची व आवश्क ठिकाणी नविन पोल बसविण्याची त्वरीत कार्यवाही नगरपरिषद प्रशासनाने करून मनमाड कर नागरिक बंधू भगिनींना न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.


अजून बातम्या वाचा..

भारतीय जनता पार्टी येवला शहर मंडल यांच्यावतीने संघटन पर्व सदस्यता नोंदणी अभियान

भारतीय जनता पार्टी येवला शहर मंडल यांच्यावतीने संघटन पर्व सदस्यता नोंदणी अभियान

२०२४ कार्यशाळेचे आयोजन येवला शहरात दहा हजार सदस्य नोंदणी चे उद्दिष्ट स्थानिक स्वराज्य संस्था विजया...

read more
मनमाड डॉक्टर्स असोसिएशन तर्फे सत्कार : नांदगाव तालुक्याच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध – आमदार कांदे

मनमाड डॉक्टर्स असोसिएशन तर्फे सत्कार : नांदगाव तालुक्याच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध – आमदार कांदे

मनमाड - मनमाड डॉक्टर असोसिएशनच्या सदस्यांनी नवनिर्वाचीत आमदार सुहास आण्णा कांदे व अंजुमताई कांदे...

read more
भाजपा मनमाड शहर व भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने सदस्य नोंदणी प्रशिक्षण कार्यशाळे चे आयोजन

भाजपा मनमाड शहर व भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने सदस्य नोंदणी प्रशिक्षण कार्यशाळे चे आयोजन

मनमाड शहरात भाजपा चे पाच हजार सदस्य नोंदणी चे उद्दिष्ट ❗विश्वातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असणाऱ्या...

read more
मनमाड शहर भाजपा मंडलाच्या वतीने भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या 100 व्या जयंती निमित्ताने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन

मनमाड शहर भाजपा मंडलाच्या वतीने भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या 100 व्या जयंती निमित्ताने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन

संपूर्ण देशातील भाजपा कार्यकर्त्यांन चे प्रेरणा स्थान भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय...

read more
.