loader image
[ays_poll id=7]

मनमाड जेऊर बस ची वेळ दीड तास अगोदर करावी – शिवसेना महिला आघाडीची मागणी

Mar 31, 2023

मनमाड – जेऊर बस ची वेळ बदलण्याबाबत शिवसेना महिला आघाडीच्या वतीने येथील आगार प्रमुखांना निवेदन देण्यात आले.
मनमाड जेऊर रात्रीची बस ही एक दीड तास आधी करावी या साठी शिवसेना महिला आघाडीने डेपो मॅनेजर मनमाड बस डेपो यांना निवेदन दिले.
मनमाड येथे शिक्षण घेण्यासाठी अनेक विध्यार्थी व विद्यार्थिनी हे मनमाड जेऊर या बसने प्रवास करतात. या बस मध्ये याणाऱ्या विध्यार्थिनीची संख्या लक्षणीय आहे. यात अस्तगाव, खादगाव, भार्डी, धनेर, जेऊर येथून विद्यार्थिनी येत असतात. या बस ची वेळ रात्री 8 वाजता आहे. सायं 5:30 वा. शाळा सुटल्यानंतर सदरील विद्यार्थिनी हया रात्री 8:00 वाजेपर्यंत मनमाड डेपो परिसरात बसून असतात. उशीर होत असल्या कारणाने काळजीपोटी अनेक विद्यार्थिनीची शाळा पालकांनी बंद केली आहे त्यामुळे त्यांना शिक्षणापासून वंचित रहावे लागत आहे. सदरील बस ही जेऊर येथे मुक्कामी जात असते.
सदरील बसची वेळ 1 ते 1:30 तास आधी केल्यास या विद्यार्थिनीची सोय होईल असे सदर दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
या प्रसंगी शिवसेना महिला आघाडी तालुकाप्रमुख विद्याताई जगताप, शहरप्रमुख संगीताताई बागुल, विधानसभा संघटक पूजाताई छाजेड, नाजमा मिर्झा,सुरेखा ढाके, नीता लोंढे, अलका कुमावत, लक्ष्मी अहिरे उपस्थित होत्या.

अजून बातम्या वाचा..

रोटरी क्लब मनमाड तर्फे पीएम श्री केंद्रीय विद्यालय मध्य रेल्वे मनमाड येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

रोटरी क्लब मनमाड तर्फे पीएम श्री केंद्रीय विद्यालय मध्य रेल्वे मनमाड येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

पीएम श्री केंद्रीय विद्यालय मध्य रेल्वे मनमाड येथे रोटरी क्लब मनमाड व मनमाड शहरातील नामांकित...

read more
मनमाड महाविद्यालयात ‘मराठी वाचन कट्टा’ सुरु  व्यक्तिमत्त्व विकासासाठी विद्यार्थ्यांनी पुस्तकांशी मैत्री करणे आवश्यक आहे  – प्राचार्य डॉ. अरुण पाटील

मनमाड महाविद्यालयात ‘मराठी वाचन कट्टा’ सुरु व्यक्तिमत्त्व विकासासाठी विद्यार्थ्यांनी पुस्तकांशी मैत्री करणे आवश्यक आहे – प्राचार्य डॉ. अरुण पाटील

  मनमाड (नाशिक) – महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात...

read more
पौष मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 17/01/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

पौष मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 17/01/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
.