loader image
[ays_poll id=7]

कळवण — दिंडोरी, कळवण, पेठ  व सुरगाणा येथील बस स्थानकांचे नूतनीकरण होणार ३१ कोटी ९९ लाखांचा अर्थसंकल्पात तरतूद – केंद्रीय राज्यमंत्री डॉ भारती  पवार 

Apr 1, 2023

कळवण दि ३१ दिंडोरी लोकसभा मतदार संघात बसमध्ये  प्रवाशांची वाढती गर्दी,  त्यांच्यासाठी मूलभूत सुविधाचा अभाव लक्षात घेऊन दिंडोरी, कळवण, पेठ  व सुरगाणाया आदिवासी तालुक्यातील एस टी बस स्थानक नूतनीकरण करण्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात ३१ कोटी ९९ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती  केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ भारती पवार यांनी दिली.

     राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आदिवासी विकासमंत्री डॉ विजयकुमार गावित यांचेक्डर आदिवासी बहुल भाग म्हणून विशेष तरतूद करण्याची मागणी केली करण्यात आली असल्याचे केंद्रीय  राज्यमंत्री  पवार यांनी सांगितले. त्यानुसार दिंडोरी लोकसभा मतदार संघातील  दिंडोरी बस स्थानकाचे आधुनिकीकरण करण्यासाठी  १० कोटी, कळवण बसस्थानकाचे नुतनीकरण व वाहनतळाचे काँक्रिटीकरण करण्यासाठी ७ कोटी ९५ लाख, पेठ बस स्थानकाची पुनर्बांधणी करण्यासाठी ८ कोटी ६७ लाख रुपये तर सुरगाणा येथील बसस्थानकाचे नुतनीकरण व वाहनतळाचे काँक्रिटीकरण करण्यासाठी ४ कोटी १७ लाख रुपयांची तरतूद केली आहे.  

            या तरतुदीमुळे उत्तर महाराष्ट्रातील लाखो भाविक चैत्रोत्सव व नवरात्रौत्सव निमित्ताने सप्तश्रुंग गडावर येणाऱ्या भाविकांची गैरसोय दूर होणार आहे, उत्तर महाराष्ट्रातील सर्व भाविक  कळवण येथूनच बसने गडावर जात असल्यामुळे कळवण येथील एस टी बस स्थानकाची जिल्ह्यात वेगळी ओळख आहे. जिल्हाभरातील हजारो प्रवाशांची बस स्थानकात वर्दळ असते. शेकडो बसेसच्या फेऱ्या येथे नियमित होतात. बस स्थानकाचे बसस्थानकाचे नुतनीकरण व वाहनतळाचे काँक्रिटीकरण करण्यासाठी प्रस्ताव शासनस्तरावर प्रस्तवित करण्यात आला होता. नुकत्याच पारपडलेल्या आदिवेशनात आदिवासी बहुल भाग म्हणून पाठपुरावा केल्याने त्यास महाराष्ट्र राज्य आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत तरतूद करण्यात आली  आहे. या बसस्थानकात  नूतनीकरणात नवीन फरशा, रंगरंगोटी, प्रवाशांना बसण्यासाठी प्रशस्त आसन व्यवस्था, अंतर्गत वीज जोडणी, आकर्षक दिवे, पंखे, प्रवाशांना बसेसची माहिती होण्यासाठी डिस्प्ले तसेच अन्य सुविधा यातून करण्यात येणार आहेत.

      करिता आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत आदिवासी क्षेत्रातील राज्य परिवहन महामंडळाच्या बसस्थानक विकास, बांधकाम, दुरुस्ती, नूतनीकरण, व वाहनतळाचे काँक्रिटीकरण करणे अन्य कामासाठी राज्यासाठी  ३५ कोटी इतकी  अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली असून त्यात कळवण व सुरगाणा येथील एस टी बस स्थानक नूतनीकरण करण्यासाठी  १२ कोटी १२ लाखांची तरतूद झाली आहे.

अजून बातम्या वाचा..

नांदगांव तालुका व शहर तसेच निमगाव मंडल भाजपा तर्फे महिला सबलीकरण सम्मेलनाचे भव्य आयोजन

नांदगांव तालुका व शहर तसेच निमगाव मंडल भाजपा तर्फे महिला सबलीकरण सम्मेलनाचे भव्य आयोजन

नांदगांव : मारुती जगधने येथे महिला सबलीकरण सम्मेलनाचे भव्य अयोजन भारतीय जनता पार्टी नांदगाव शहर,...

read more
छत्रपती शिवाजी महाराज नगर. दत्त पूल येथे हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे याच्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले

छत्रपती शिवाजी महाराज नगर. दत्त पूल येथे हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे याच्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले

साहेब, तुम्ही महाराष्ट्राला लाभलात तेच मुळात इथे ‘महाराष्ट्रधर्म’ वाढविण्यासाठी, तुम्ही विचारांचं...

read more
प्रजासत्ताक दिनी कर्तव्य पथावर अवतरणार ‘भारतीय लोकशाहीचे प्रेरणास्थान : छत्रपती शिवाजी महाराज’ या संकल्पनेवर राज्याचा चित्ररथ

प्रजासत्ताक दिनी कर्तव्य पथावर अवतरणार ‘भारतीय लोकशाहीचे प्रेरणास्थान : छत्रपती शिवाजी महाराज’ या संकल्पनेवर राज्याचा चित्ररथ

कर्तव्य पथावर प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या पथसंचलनासाठी महाराष्ट्राच्या वतीने 'भारतीय लोकशाहीचे...

read more
बघा व्हिडिओ-ओम मित्र संचलित श्रीराम जन्मोत्सव समिती तर्फे श्रीराम प्राण प्रतिष्ठा सोहळा धार्मिक परंपरा नुसार श्रीराम रक्षा पठण, भजन महाआरती करून साजरा

बघा व्हिडिओ-ओम मित्र संचलित श्रीराम जन्मोत्सव समिती तर्फे श्रीराम प्राण प्रतिष्ठा सोहळा धार्मिक परंपरा नुसार श्रीराम रक्षा पठण, भजन महाआरती करून साजरा

मनमाड - ओम मित्र मंडळ संचालित श्रीराम जन्मोत्सव समिती मनमाड तर्फे विश्वातील समस्त हिंदू धर्माला...

read more
टीम कॅट व मनमाड शहर व्यापारी महासंघ यांच्या वतीने भगवान श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठा निमित्त महाआरती

टीम कॅट व मनमाड शहर व्यापारी महासंघ यांच्या वतीने भगवान श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठा निमित्त महाआरती

याप्रसंगी 1008 श्रीफळांनी श्रीराम या नावाची आरास काढण्यात आली. याप्रसंगी व्यापारी महासंघाचे...

read more
बघा व्हिडिओ – छत्रे विद्यालयातील श्रीराम सहस्त्रनाम जप रांगोळीने वेधले लक्ष

बघा व्हिडिओ – छत्रे विद्यालयातील श्रीराम सहस्त्रनाम जप रांगोळीने वेधले लक्ष

मनमाड शहरातील श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या छत्रे विद्यालयात श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त...

read more
.