नांदगाव: मारुती जगधने सोशल मिडीयावर हिंदु समाजा बद्दल आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केली म्हणुन
२९५ अ प्रमाणे नांदगाव पोलिसात घटनेचा गुन्हा दाखल झाला आहे .या संदर्भात नांदगाव सकल हिंदु समाजाच्या वतीने दि २४ बुधवार रोजी नांदगाव शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले होते शिवाय सकल हिंदुसमाजाच्या वतीने मोर्चा काढून पोलिसांना निवेदन सादर करुन समाजकंटकावर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली .
शहरात व तालुक्यातील न्याडोंगरी,बोलठाण,जातेगांव आदी ठिकाणी याचे पडसाद उमटले असुन येथे ही गाव बंद ठेवल्याच्या वार्ता आहेत .या संदर्भात समाज बांधवांना मार्गदर्शन करताना सकाळ सञात
अप्पर पोलिस अधिक्ष अनिकेत भारती म्हणाले की
तालुक्यात समाजा समाजात तेढ निर्माण करणारे मेसेज समाज माध्यमात टाकले जात आहे या मुळे दोन समाजात तेढ निर्माण होईल असे कृत्य कोणी करु नये असे आवाहन नांदगाव पोलीस स्थानकात झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत व सकल हिंदु समाजाला करण्यात आले .
दरम्यान नांदगाव येथे सोशल मिडीयावर दोन समाजात तेढ निर्माण करणार्या व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला आहे ,या वेळी बोलताना अप्पर पोलीस निरीक्षक अनिकेत भारती म्हणाले पोलिसांचा कोणताच धर्म नाही ज्याच्या धार्मीक भावना दुखावल्या त्यांनी फिर्याद द्यावी.. घटने बाबात,अपेक्षीत कारवाई होत आहे . कृत्य करणार्यावर कारवाई होईल त्यामागील सत्य हुडकुन काढू .तसेच
बोलठाण घेटनेतील सत्य उलगडून काढु,
चांगल्या पावन पर्वावर रामराज्याची अपेक्षा करतो आहे.कारवाईवर भरवसा ठेवा गांव बंद करुन जनतेला वेठीस धरु नये
या साठी एक टिम तयार करा त्यातुन केलेले काम तुमच्या पर्यंत पोहचवु असे आवाहन वरिष्ठ पोलीस अधिकारी
अनिकेत भारती, यांनी केले पोलीस उप अधिक्षक
सोहेल शेख,पो नि प्रितम चौधरी यांनी उपस्थित नागरीकाना मार्गदर्शन केले.यावेळी झालेल्या शांतता समितीच्या बैठकीला
संतोश गुप्ता,दत्तराज छाजेड,संजय सानप,
वाल्मीक जगताप, भगवान सोनवने,संगिता सोनवने,
शर्मा,यांनी सहभाग नोंदविला. दरम्यान नांदगांव येथे चोख पोलीस बंदोबस्त देण्यात आला आहे .
आवाहन :
तालुक्यातील सर्व whatsapp चे ग्रुपप ॲडमिन यांना आवाहन केले की, अशा प्रकारचे मेसेज प्रकाशित शेअर केल्यास ग्रुप ॲडमिन वर आणि चुकीचे मेसेज शेअर करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होणार असून याबाबत सर्वांनी खबरदारी घ्यावी तसेच वैयक्तिक फेसबुक आणि इतर सोशल मीडियावर देखील शांततेचा भंग होईल अशा प्रकारचे मेसेज शेअर करू नये तालुक्यातील सर्व नागरिकांनी याबाबत खबरदारी घ्यावी असे पोलीस निरीक्षक चौधरी यांनी आवाहन केले आहे. आपणा सर्वांना ठिणगी वेब न्यूजर्टल द्वारे मे. पो.नि. प्रितम
चौधर नांदगाव.