loader image
[ays_poll id=7]

प्रगती अर्बन बँकेला १ कोटी ४२ लाख रुपायांचा निव्वळ नफा

Apr 3, 2023

मनमाड – मनमाड शहरातील अग्रगण्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दि प्रगती अर्बन को. ऑप बँकेला मार्च २०२३ अखेर १ कोटी ४२ लाख रूपयांचा निव्वळ नफा झाला आहे, अशी माहिती पतसंस्थेचे अध्यक्ष कल्याणचंद ललवाणी यांनी दिली आहे.

३१ मार्च २०२३ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात आयकर व इतर सर्व प्रकारच्या कायदेशीर तरतूदींची पुर्तता करून हा नफा झाला आहे. मार्च २०२३ अखेर बँकेच्या आर्थिक परिस्थितीची माहितीही त्यांनी दिली. बँकेचे वसुल भागभांडवल १६७.९२ लाख, राखीव व इतर निधी रक्कम २१५४.९३ लाख, ठेवी रक्कम १२९२४.१० लाख, येणे कर्ज रक्कम रू.५०७९.६७ लाख, गुंतवणूक रक क रू.९२५३.१६ लाख असल्याचे त्यांनी नमुद केले आहे. बँकेचे ग्रॉस एन.पी.ए.चे प्रमाण ३.०९ टक्के इतके कमी राखण्यात यश मिळाले आहे. नेट एन.पी.ए.चे प्रमाण शुन्य टक्के आहे. बँकेचे ग्राहक व सभासदांमुळेच हे शक्य झाल्याचे सांगून बँक ग्राहकांना अधिकाधिक उत्कृष्ट सेवा देण्याचा प्रयत्न करीत असल्याचेही त्यांनी नमूद केले. यावेळी उपाध्यक्ष पोपटशेठ सुराणा, कार्यकारी संचालक अशोक शिंगी, जनसंपर्क संचालिका श्रीमती पुष्पा ललवाणी, संचालक सुभाष संकलेचा, नविन शिंगी, मनोज बाफना, संदीप ललवाणी, सुनील भंडारी, दत्तात्रय हादगे, मनोज गवळी, श्रीमती पुष्पा राका, पंढरीनाथ वरखेडे, श्रीमती पुष्पा लोढा आदींसह बँकेचे अधिकारी व सेवक वर्ग उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

भुमी क्रिकेट अकॅडमीतील साक्षी शुक्ला, आर्या साळुंखे , सुहानी बोरा व भाविका कौरानी नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन अंडर 19 महिला संघात सामील

भुमी क्रिकेट अकॅडमीतील साक्षी शुक्ला, आर्या साळुंखे , सुहानी बोरा व भाविका कौरानी नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन अंडर 19 महिला संघात सामील

महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी ( जिल्हास्तरीय सामने ) नंदुरबार...

read more
भारतीताई पवार यांना सर्वाधिक मते आपल्या मतदारसंघातून मिळवून द्यायची असल्याचा निर्धार करा : आमदार सुहास (आण्णा) कांदे

भारतीताई पवार यांना सर्वाधिक मते आपल्या मतदारसंघातून मिळवून द्यायची असल्याचा निर्धार करा : आमदार सुहास (आण्णा) कांदे

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या वतीने मतदार संघातील जिल्हा परिषद...

read more
गौरवास्पद – मनमाड शहरातील ख्यातनाम डॉक्टर कुलकर्णी दाम्पत्यांचे चिरंजीव आणि मनमाड चे भूमिपुत्र डॉ.तन्मय संदीप कुलकर्णी बजावणार पुण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटल मध्ये वैद्यकीय सेवा

गौरवास्पद – मनमाड शहरातील ख्यातनाम डॉक्टर कुलकर्णी दाम्पत्यांचे चिरंजीव आणि मनमाड चे भूमिपुत्र डॉ.तन्मय संदीप कुलकर्णी बजावणार पुण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटल मध्ये वैद्यकीय सेवा

मनमाड - मनमाड शहरातील सुप्रसिद्ध डॉक्टर संदीप कुलकर्णी यांचे चिरंजीव मनमाड चे भूमिपुत्र डॉ. तन्मय...

read more
.