Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

कांदा पिकाची ई. पिक नोंदीची जाचक अट त्वरीत रद्द करावी – कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची मागणी

Apr 3, 2023

नांदगाव – (सोमनाथ घोंगाणे)
महाराष्ट्र शासनाने कांदा पिकासाठी ३५० रूपये क्विंटल अनुदान जाहीर केले पण सातबारा उताऱ्यावर ई पिक पेरा नोंद बंधनकारक केल्याने सुमारे ९० % शेतकर्यांची ई पिक नोंद नसल्याने शेतकऱ्यांना अनुदान मिळण्यास मोठी अडचण निर्माण झाली आहे. सदर अट त्वरीत रद्द करावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना, कांदा उत्पादक संघटना यांचेकडून आज तहसिलदार नांदगाव यांना निवेदन देण्यात आले.
राज्य कांदा उत्पादक संघटनेचे सोमनाथ मगर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे निलेश चव्हाण,परशराम शिदें,विशाल वडघुले,योगेश वाघ,भाऊसाहेब जाधव यांच्या नेतृत्वाखाली सदर निवेदन देण्यात आले.
शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेता अनुदानाचा लाभ मिळण्यासाठी पिक पेरा ई नोंद ही अट त्वरीत करावी व सरसकट सर्व कांद्याला अनुदान देण्यात यावे. तसे यंत्रणेला त्वरीत आदेश देवून पीक नोंदणीचे कामकाज करावे अशा मागणीचे निवेदन देण्यात आले.

अजून बातम्या वाचा..

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे लेखन भाषण डिजिटल स्वरूपात उपलब्ध होणार डॉ नितीन राऊत यांच्या पुढाकाराला यश

मुंबई - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लेखन, भाषण व विचार लवकरच मराठीत डिजिटल स्वरूपात उपलब्ध होणार...

read more
मनमाडला पत्रकार दिनानिमित्त कार्यशाळेचे आयोजन

कऱ्ही येथे क्रांतिवीर वसंतराव नाईक यांना स्मृतिदिनी अभिवादन व विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण !

नांदगाव तालुक्यातील कऱ्ही येथील व्ही.एन.नाईक माध्यमिक विद्यालयात क्रांतिवीर वसंतराव नाईक यांना...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]