Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये जागतिक कृषि महोत्सव आढावा बैठक संपन्न….

Dec 14, 2021

अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग (दिंडोरी प्रणित) यांचे वतीने ग्राम व नागरी अभियान प्रशिक्षण आणि पुढील वर्षी होणाऱ्या जागतिक कृषी महोत्सव निमित्त आढावा बैठक श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र मनमाड येथे संपन्न झाली.

यावेळी या मार्गातील गुरुमाऊली यांचे पुत्र कृषिरत्न आबासाहेब मोरे यांनी उपस्थित सेवेकरी व शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी आबासाहेब मोरे यांनी आरोग्य तसेच विषमुक्त कृषी व विषमुक्त सात्विक अन्न तसेच बालसंस्कार, स्वयंरोजगार व बचत गट तसेच विवाह संस्कार यावर विशेष असे मार्गदर्शन केले. तत्पूर्वी आबासाहेब मोरे यांचे स्वागत करण्यात आले. दीपप्रज्वलनानंतर भूमातेचा अर्थात माती पूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला, आबासाहेबांचा रोप देऊन मनमाड, नांदगाव सेवा केंद्राद्वारे मा.आ.जगन्नाथ धात्रक, नगराध्यक्षा सौ.पद्मावती धात्रक, नगरसेवक गणेश धात्रक, अरुण गायकवाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या प्रसंगी मराठी अस्मिता, बालसंस्कार, कृषी पर्यावरण, प्रकृती विभाग इत्यादींचे आकर्षक स्टॉल लावण्यात आलेले होते. कार्यक्रमासाठी मनमाड तसेच नांदगाव तालुक्यातील श्री स्वामी सेवेकरी, शेतकरी, महिला व पुरुष बांधव उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

महिलेच्या गळ्यातील पोत ओरबाडून चोरटे पसार; शहरातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण

महिलेच्या गळ्यातील पोत ओरबाडून चोरटे पसार; शहरातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण

मनमाड- शहरातील अत्यंत गजबजलेल्या विवेकानंद नगर दोन परिसरात राहणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]