loader image
[ays_poll id=7]

नांदगाव बाजारसमिती निवडणूक – १४९ उमेदवारी अर्ज दाखल

Apr 4, 2023


तालुक्यातील नांदगाव व मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने राजकारण तापले आहे. नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी १४९ उमेदवारांनी सोमवारी (ता.३) आपले अर्ज दाखल केले.या वेळी उमेदवारांसोबत अर्ज सादर करताना आमदार सुहास कांदे,ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे,माजी आमदार पंकज भुजबळ,अॅड.अनिल आहेर यांनी हजेरी लावली.यंदा बाजार समितीच्या संचालक मंडळाची निवडणूक सरळ लढतीची असल्याने कुठल्या पॅनेलमधून कुणाला उमेदवारी बहाल होईल याची नेमकी खात्री मिळत नसल्याने अनेक इच्छुकांनी आपल्यासाठी फिल्डींग लावणे सुरू केल्याचे दिसून येत आहे.
आमदार सुहास कांदे ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे माजी आमदार पंकज भुजबळ माजी आमदार अँड अनिल आहेर हे उपस्थितीत होते.नांदगाव बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या अठरा जागेसाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी सोसायटी गटात सर्वसाधारण एकूण ८१तर ग्रामपंचायत गटातून ४८,व्यापारी गटात १३,हमाल मापारी गटात ७ असे एकूण १४९ उमेदवारांनी आज अर्ज दाखल केले. आज उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या मध्ये माजी सभापती तेज कवडे,विलासराव आहेर,मविप्रचे संचालक अमित पाटील, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष विजय पाटील,अनंत इनामदार,एकनाथ सदगीर,उदय पवार,समाधान पाटील,कैलास पाटील,दर्शन आहेर,अॅड.अमोल आहेर,राजेंद्र देशमुख,उदय पवार,अमित नहार,बंडू पाटील,पुंजाराम जाधव,अलकाताई कवडे,मंगलाताई काकळीज,भाऊसाहेब पाटील,यज्ञेश कलंत्री,बाळकाका कलंत्री,सोमनाथ घोंगाणे,संजय सानप,मुकुंद खैरनार,नूतन कासलीवाल,गोकूळ कोठारी,अमोल नावंदर,भास्कर कासार,नीलेश हिप्पर,नितीन कवडे,सचिन हिरे,राजेंद्र लाठे,शिवाजी बच्छाव,नलिनी बोरसे,अमित बोरसे,ज्योती सुर्यवंशी,बेबीताई पगार,चंद्रकला वाकळे,हरेश्वर सुर्वे,कैलास गायकवाड,भागवत बाबळे,धोंडीराम काळे,आदी उमेदवरांचाही अर्ज करणाऱ्यांमध्ये समावेश आहे.दाखल आज दाखल झालेल्या उमेदवारी अर्जाची छाननी ५ एप्रिलला होणार असून त्यात किती अर्ज अवैध ठरतात हा उत्सुकतेचा भाग आहे.माघारीसाठी मोठा अवधी देण्यात आला आहे.२१ एप्रिलला चिन्ह वाटप होईल या नंतर पॅनलच्या निर्मितीची घोषणा पॅनेल प्रमुख करतील.


अजून बातम्या वाचा..

सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

जनकल्याण रक्तकेंद्राच्या ३६ वा वर्धापन दिनानिमित्त शंकराचार्य संकुल गंगापूर रोड येथे शिबीर...

read more
के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

दिनांक 26/8/2025 रोजी के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र...

read more
भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

आज दि.२६ ऑगस्ट २०२५ रोजी शिक्षण मंडळ भगूर संचालित नूतन माध्यमिक विद्यालय...

read more
मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड - बुधवार दिनांक 27 /08/2025 रोजी भाद्रपद शुध्द श्री गणेश चतुर्थी निमित्त सकाळी ठीक 09-30...

read more
.