loader image
[ays_poll id=7]

मनमाड महाविद्यालयात जागतिक आरोग्य दिनानिमित्त स्ट्रेस मॅनेजमेंट विषयावर वेबिनार संपन्न

Apr 7, 2023

मनमाड: महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय यांच्या IQAC व प्राणिशास्त्र विभागातर्फे जागतिक आरोग्य दिनानिमित्त स्ट्रेस मॅनेजमेंट या विषयावर नाशिक येथील सायकॉलॉजिस्ट श्रीमती सुचिता भदाने यांचे व्याख्यान 7 एप्रिल 2023 रोजी ऑनलाइन पद्धतीने आयोजित करण्यात आले. दैनंदिन जीवनशैलीत अनेक लहान लहान गोष्टींचा सतत विचार, अपूर्ण झोप, कामाचा व्याप अशा अनेक गोष्टी ताण तणावासाठी कारणीभूत असतात. त्या गोष्टींकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक असेल तसेच वेळेचे नियोजन, संतुलित आहार,सात तास शांत झोप सोबतच एक तास योगा व व्यायाम असेल तर स्ट्रेस तयार होत नाही आणि आपण आजारांना बळी पडत नाही,असे मत त्यांनी मनोगतातून व्यक्त केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी जर तणावमुक्ततेतून अभ्यासाकडे व आपल्या कामांमध्ये लक्ष केंद्रित केले तर तणाव मुक्त होण्यास मदत होईल. या कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ गजानन शेंडगे, कुलसचिव समाधान केदारे उपस्थित होते . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ पवनसिंग परदेशी, प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ जगदीशभाई वसईत, तर आभार प्रदर्शन IQAC समन्वयक डॉ. मिलिंद आहेरे यांनी केले. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने शि क्षक,प्रशासकीय कर्मचारी आणि विद्यार्थी
उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

भुमी क्रिकेट अकॅडमीतील साक्षी शुक्ला, आर्या साळुंखे , सुहानी बोरा व भाविका कौरानी नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन अंडर 19 महिला संघात सामील

भुमी क्रिकेट अकॅडमीतील साक्षी शुक्ला, आर्या साळुंखे , सुहानी बोरा व भाविका कौरानी नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन अंडर 19 महिला संघात सामील

महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी ( जिल्हास्तरीय सामने ) नंदुरबार...

read more
भारतीताई पवार यांना सर्वाधिक मते आपल्या मतदारसंघातून मिळवून द्यायची असल्याचा निर्धार करा : आमदार सुहास (आण्णा) कांदे

भारतीताई पवार यांना सर्वाधिक मते आपल्या मतदारसंघातून मिळवून द्यायची असल्याचा निर्धार करा : आमदार सुहास (आण्णा) कांदे

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या वतीने मतदार संघातील जिल्हा परिषद...

read more
गौरवास्पद – मनमाड शहरातील ख्यातनाम डॉक्टर कुलकर्णी दाम्पत्यांचे चिरंजीव आणि मनमाड चे भूमिपुत्र डॉ.तन्मय संदीप कुलकर्णी बजावणार पुण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटल मध्ये वैद्यकीय सेवा

गौरवास्पद – मनमाड शहरातील ख्यातनाम डॉक्टर कुलकर्णी दाम्पत्यांचे चिरंजीव आणि मनमाड चे भूमिपुत्र डॉ.तन्मय संदीप कुलकर्णी बजावणार पुण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटल मध्ये वैद्यकीय सेवा

मनमाड - मनमाड शहरातील सुप्रसिद्ध डॉक्टर संदीप कुलकर्णी यांचे चिरंजीव मनमाड चे भूमिपुत्र डॉ. तन्मय...

read more
मनमाड येथे शांतीब्रम्ह एकनाथ महाराज चतुर्थ शतकोत्तर रौप्य महोत्सवाला भाविकांचा उस्फूर्त प्रतिसाद.सोहळ्यात श्रवणीय किर्तनांची पर्वणी

मनमाड येथे शांतीब्रम्ह एकनाथ महाराज चतुर्थ शतकोत्तर रौप्य महोत्सवाला भाविकांचा उस्फूर्त प्रतिसाद.सोहळ्यात श्रवणीय किर्तनांची पर्वणी

  मनमाड : योगेश म्हस्के शांतीब्रम्ह एकनाथ महाराज चतुर्थ शतकोत्तर रौप्य महोत्सवा निमित्ताने...

read more
.