loader image
[ays_poll id=7]

मविप्र महाविद्यालयात दुर्मिळ व चलनी नाणी प्रदर्शनाचे उद्घाटन

Apr 8, 2023

मराठा विद्या प्रसारक समाजाच्या कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय अर्थशास्त्र व वाणिज्य विभागांतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नाणे प्रदर्शन व अर्थमिती यावर विद्यार्थ्यांकडून पोस्टर प्रेसेंटेशन स्पर्धा घेण्यात आले. या नाणे प्रदर्शनाचे उद्घाटन नांदगाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री. अमोल खरे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी डी गव्हाणे, महाविद्यालयीन परीक्षा अधिकारी प्रा. आर एस बहोत, नाणे प्रदर्शन व अर्थमिती कार्यक्रमाच्या संयोजक डॉ. अनिता फापाळे इतर प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी जुनी चलनातून बाद झालेली नाणी जमवून त्यांची माहितीसह पोस्टर प्रदर्शित केले तसेच आत्तापर्यंत चलनात असलेली नाणी व चलनातून बाद झालेली नाही यांचे वेगवेगळे ग्रुपिंग करून नाणे प्रदर्शन भरवण्यात आले होते कार्यक्रमाचे उद्घाटक व प्रमुख पाहुणे श्री अमोल खरे यांनी विद्यार्थ्यांनी अशा प्रकारचे छंद जोपासावे यातून जुना ठेवा नवीन पिढीसाठी उपलब्ध करून देता येईल असे मत मांडले तसेच त्यांच्या संग्रही असलेले शिवकालीन शिवराय शिवराई व इतर नाणे महाविद्यालयास भेट म्हणून देणार आहे याबद्दल महाविद्यालयाकडून त्यांचे विशेष आभार मानण्यात आले. कु. अपेक्षा बोराडे, मानसी उगलमुगले यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयाची विद्यार्थिनी कू. पूनम कोल्हे व चैताली घुमरे यांनी केले. तर आभार कू. अनामिका धिवर हिने मांडले. संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन हे विद्यार्थ्यांनीच केले. अमित चव्हाण, विशाल जाधव, अपेक्षा बोराडे, निशा कांबळे या विद्यार्थ्यांनि विशेष परिश्रम घेतले. हे प्रदर्शन महाविद्यालयातील विद्यार्थी व पालकांसाठी पुढील 3-4 दिवस राहील.

अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ-भाद्रपद महागणेशोत्सव 2024 निमित्त वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी

बघा व्हिडिओ-भाद्रपद महागणेशोत्सव 2024 निमित्त वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी

छप्पन महाभोग (महानैवेद्य) कार्यक्रमाचे आयोजन संपन्न गणेश भक्तांचा उदंड प्रतिसाद मनमाड - आम्ही...

read more
नाशिक जिल्हा बँकेने ९ कर्जदारांना बजावल्या अंतीम जप्तीच्या नोटीसा; थकबाकीदारांमध्ये भीतीचे वातावरण ?

नाशिक जिल्हा बँकेने ९ कर्जदारांना बजावल्या अंतीम जप्तीच्या नोटीसा; थकबाकीदारांमध्ये भीतीचे वातावरण ?

नांदगाव : मारुती जगधने नांदगांव तालुक्यातील जिल्हा बँकेचे कर्ज घेतलेल्या व थकित झालेल्या ९...

read more
मनमाड महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा… “हिंदी फक्त राष्ट्रभाषाच नव्हे तर विश्व भाषा” – श्री.राजेंद्र जगताप

मनमाड महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा… “हिंदी फक्त राष्ट्रभाषाच नव्हे तर विश्व भाषा” – श्री.राजेंद्र जगताप

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या पदव्युत्तर...

read more
भाद्रपद महागणेशोत्सव ➖2024 निमित्त रविवारी वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी छप्पन महाभोग (महानैवेद्य) व श्री सत्यविनायक महापूजा या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

भाद्रपद महागणेशोत्सव ➖2024 निमित्त रविवारी वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदीरात सलग 10 वर्षी छप्पन महाभोग (महानैवेद्य) व श्री सत्यविनायक महापूजा या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

मनमाड - आम्ही परंपरा पाळतो... आम्ही संस्कृती चे रक्षण करतो.... हे ब्रीद घेऊन मनमाड शहरात धार्मिक...

read more
मनमाड करांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा तृप्ती पाराशर आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

मनमाड करांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा तृप्ती पाराशर आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

सुवा फिजी येथे १४ ते २१ सप्टेंबर २०१४ रोजी होणाऱ्या कॉमनवेल्थ चँपियनशिप साठी महाराष्ट्रातील एकमेव...

read more
मनमाड शहर भाजपा तर्फे आरक्षण विरोधी राहुल गांधी व हिंदू विरोधी शरद पवार यांचे विरोधात जोरदार घोषणा बाजी करीत निषेध आंदोलन

मनमाड शहर भाजपा तर्फे आरक्षण विरोधी राहुल गांधी व हिंदू विरोधी शरद पवार यांचे विरोधात जोरदार घोषणा बाजी करीत निषेध आंदोलन

राहुल गांधी यांनी अमेरिकेतील एका मुलाखती दरम्यान काँग्रेस भारतात सत्तेत आल्यास आरक्षण काढून टाकू...

read more
कासलीवाल स्कूलमध्ये माता पालकांसाठी कुकिंग बॅटल (कुकिंग विदाऊट फ्लेम्स ) स्पर्धेचे आयोजन…..

कासलीवाल स्कूलमध्ये माता पालकांसाठी कुकिंग बॅटल (कुकिंग विदाऊट फ्लेम्स ) स्पर्धेचे आयोजन…..

नांदगांव : दि १३ मारुती जगधने दि.13 सप्टेंबर 2024 नांदगाव येथील जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडियम...

read more
.