loader image
[ays_poll id=7]

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती शांततेत आणि उत्साहात साजरी करावी – पोलीस अधिक्षक अनिकेत भारती

Apr 10, 2023

मनमाड – मनमाड शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करण्याची आगळी परंपरा आहे. कायदा व सुव्यवस्था पाळून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती शांततेत व उत्साहात साजरी करावी” असे आवाहन अप्पर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती यांनी केले.

मनमाड पोलिस स्थानकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर आयोजित शांतता समितीच्या बैठकीत अनिकेत भारती बोलत होते. प्रशासनाने सर्व समस्यांचे निरसन करून मिरवणूक काळात अडसर येणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना पोलिस उपअधीक्षक समरसिंह साळवे यांनी केल्या. कार्यकर्त्यांनी भान पाळून गैरकृत्य करू नये. गैरकृत्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना कोणीही पाठीशी घालणार नाही. कार्यकर्त्यांनीही आपली जबाबदारी सांभाळून प्रशासनाला सहकार्य करावे, असा सूर उपस्थितांनी व्यक्त केला

यावेळी रिपाई जिल्हाध्यक्ष राजेंद्र आहिरे, माजी नगराध्यक्ष राजेंद्र पगारे, अँड. सुधाकर मोरे, गंगाधर त्रिभुवन, गुरुकुमार निकाळे,
महेंद्र गरुड, एस. एम. भाले, मास्टर अन्वरभाई, डॉ. वर्षा झाल्टे आदींनी विविध सूचना केल्या. उपविभागीय पोलिस अधिकारी समरसिंग साळवे, रिपाई जिल्हा संपर्क प्रमुख गंगादादा रिपाई जिल्हा संपर्क प्रमुख गंगादादा त्रिभुवन, भीमोत्सव आयोजन समितीचे निमंत्रक दिनकर धिवर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष आकाश वाघमारे, शिवसेनेचे (ठाकरे गट) उपजिल्हा प्रमुख संतोष बळीद, अशोक पाईक, व्यापारी महासंघ अध्यक्ष राजेंद्र पारीक, एस. एम. भाले, अॅड. आम्रपाली निकम, सुभाष
नहार, दिलीप नरवडे, शिवसेना (शिंदे गट) शहरप्रमुख मयूर बोरसे, उमाकांत राय, राजू पवार, वंदेश गांगुर्डे, सुनील साळवे, प्रमोद आहिरे, सिद्धार्थ संसारे, सन्नी फसाटे, नाना जाधव, फुले, शाहू, आंबेडकर मुस्लिम विचार मंचचे कार्याध्यक्ष फिरोज शेख, कृष्णा पगारे, कादीर शेख, प्रशांत दराडे, विशाल छाजेड, राहुल घोडेराव, कमलेश गरुड आदींसह विविध पक्षांचे कार्यकतें, सार्वजनिक जयंती उत्सव समित्यांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलिस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांनी सूत्रसंचालन केले.

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या...

read more
कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

आज दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी नाशिक कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

दिनांक :12/11/2025   कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न झाली....

read more
नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

  मुंबई, दि. १३ - नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांकरिता संकेतस्थळावर फक्त...

read more
.