loader image

तरुणांनी व्यसनापासून दुर राहावे – स्वाती गोडबोले

Apr 10, 2023


मनमाड दि.१०:- तरुणांमधल्या वाढत्या व्यसनांना तथाकथित नव्या जीवनशैली जबाबदार आहेत. दारू पिण्याची वाढती प्रतिष्ठा एकीकडे फॅशन बनत चालली असून मुलांमध्ये पार्टी कल्चर संस्कृती झपाट्याने वाढत आहे, त्याला केवळ आजची तरुण पिढीच जबाबदार आहे असे होत नाही ,तर पालकही तितकेच जबाबदार आहेत. तरुणांमधली व्यसनाधीनता आजच जर नियंत्रित होऊ शकली नाही तर भविष्यात त्याचे दूरगामी परिणाम केवळ एका कुटुंबावर नाही तर सबंध राष्ट्रावर होतील म्हणून तरुणांनी व्यसनांपासून दूर राहावे असे आवाहन केले. प्रसिद्ध भूलतज्ञ स्वाती गोडबोले यांनी केले. 

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय, मनमाड येथे महिला विकास समिती व वांग्मय मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (ता.१०)आयोजित केलेल्या आभासी व्याख्यानात (ऑन लाईन वेबिनार) डॉ. गोडबोले यांनी वाढती व्यसनाधीनता याविषयी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण पाटील, उप प्राचार्य डॉ. जी. एल.शेंडगे, हिंदी विभागाचे प्रमुख जे वाय इंगळे, इंग्रजी विभागाच्या प्रमुख प्रा. कविता काखंडकी, प्रा. पेडेकर, प्रा राठोड, प्रा.अमर ठोंबरे, प्रा.संदीप ढमाले, आदी उपस्थित होते.

डॉ.गोडबोले पुढे म्हणाल्या की, व्यसन करणे ही आजकाल एक फॅशन बनत चालली आहे. परंतु त्याचे दुष्परिणाम लहानांपासून मोठ्यांपर्यंत वाढत चाललेले आहे . केवळ मुलांमध्येच नाही तर मुलींमध्येही दारू सिगारेटचे प्रमाण कमालीचे वाढले असून त्याचा प्रत्यय अगदी रस्त्यांवर आता येत चालला आहे. मुलं- मुली बिनधास्तपणे कुठे बार मध्ये तर कुठे रस्त्यांवर सिगरेट पिताना गुटखा खाताना, दारू पिताना, आढळत आहे. आपल्याला मिळालेले निसर्गदत्त शरीर हे खरंतर मूळतः अतिशय स्वच्छ आणि पवित्र असं आहे मात्र सिगारेट दारू सारख्या व्यसनांनी त्यावर मलीनता येते परिणामी कॅन्सर सारख्या भयंकर आजाराचा सामना करावा लागतो प्रसंगी अवयव प्रत्यारोपणही करावे लागते. या साऱ्या गोष्टी जर टाळायच्या असतील तर आपण व्यसनांना तिलांजली देऊन चांगल्या आरोग्याचा अंगीकार करावा, असे आवाहन डॉ.गोडबोले यांनी शेवटी केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरुण पाटील यांनीही आपल्या मनोगतातून व्यसनाधीन विद्यार्थ्यांचे त्यांना आलेले अनुभव यावेळी कथन केले. डॉ.गोडबोले या सद्यस्थितीत दक्षिण आफ्रिकेतील केनिया मध्ये वैद्यकीय व्यवसायात कार्यरत असून मागील अनेक वर्ष त्या व्यसनमुक्ती चळवळीशी जोडल्या गेल्या आहेत. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना समुपदेशन व्हावे, हा मानस ठेवून महाविद्यालयाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. कविता काखंडकी यांनी केले. डॉ. गोडबोले यांचा परिचय प्रा. पेडेकर यांनी करून दिला. कार्यक्रमाचे आभार प्रा. डॉ. जे.वाय .इंगळे यांनी केले.


अजून बातम्या वाचा..

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड मध्ये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन.

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड मध्ये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन.

  मनमाड:- एच.ए. के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये शाळेचे पर्यवेक्षक शाहिद अख्तर अन्सारी...

read more
मनमाड बाजार समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे दीपक गोगड बिनविरोध

मनमाड बाजार समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे दीपक गोगड बिनविरोध

मनमाड सहा महिन्यापूर्वी महाविकास आघाडीतर्फे सभापती म्हणुन विराजमान झालेले माजी आमदार संजय पवार...

read more
बघा व्हिडिओ-नांदगाव येथे ७८ गोवंश जनावरांची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या ५ व्यक्तीवर गुन्हा दाखल

बघा व्हिडिओ-नांदगाव येथे ७८ गोवंश जनावरांची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या ५ व्यक्तीवर गुन्हा दाखल

नांदगांव : मारुती जगधने विनापरवाना, अमानुषपणे पाळीव प्राण्यांची वाहतूक करुन त्यांच्या मृत्युस...

read more
अवकाळी पाऊस आणी गारपीट मुळे झालेले नुकसान साठी तात्काळ पंचनामे करून मदत जाहीर करा- भाजपा ओ बी. सी प्रदेश सचिव सागर फाटे

अवकाळी पाऊस आणी गारपीट मुळे झालेले नुकसान साठी तात्काळ पंचनामे करून मदत जाहीर करा- भाजपा ओ बी. सी प्रदेश सचिव सागर फाटे

नांदगाव सोमनाथ घोगांणे अतिवृष्टी आणी गारपीट वाऱ्यासह अवकाळी पाऊस मुळे संपूर्ण राज्यात शेतपिकाचे...

read more
.