मनमाड:- एच.ए. के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये शाळेचे पर्यवेक्षक शाहिद अख्तर अन्सारी यांच्या अध्यक्षतेखाली शाळेचे ज्येष्ठ शिक्षक शेख आरिफ कासम, शानूल सुभाष जगताप यांच्या हस्ते भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, महामानव, प्रज्ञा सूर्य, बोधिसत्व, कायदे पंडित,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
शाळेतील विदयार्थ्यांनींनी व शानूल जगताप सर यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याची माहिती दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक सैय्यद अफरोजोद्दीन यांनी केले. तसेच शाळेचे मुख्याध्यापक भुषण दशरथ शेवाळे व संस्थेचे सदस्या आयशा मोहम्मद सलीम गाजियानी यांचे मार्गदर्शन लाभले.