loader image
[ays_poll id=7]

महावितरणला सर्वोत्कृष्ट वीज वितरण कंपनीचा पुरस्कार

Apr 11, 2023


 

नाशिक/मुंबई, दि.१० एप्रिल २०२३:
‘इंडिपेंडंट पॉवर प्रोड्युसर्स असोसिएशन ऑफ इंडिया (आयपीपीआयए)’ या वीज क्षेत्रातील अग्रगण्य संस्थेचा देशातील सर्वोत्कृष्ट वीज वितरण कंपनीचा पुरस्कार महावितरणला मिळाला असून याखेरीज ग्राहक जागृती, माहिती तंत्रज्ञानाचा कल्पक वापर आणि विजेच्या मीटरसाठी आधुनिक रेडिओ फ्रिक्वेन्सी तंत्रज्ञानाचा वापर केल्याबद्दल अन्य पुरस्कार मिळाले.

महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी या यशाबद्दल अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. महावितरणचे अधीक्षक अभियंता निखिल मेश्राम यांनी बेळगाव येथे एका समारंभात हे पुरस्कार कंपनीच्या वतीने नुकतेच स्वीकारले. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय विद्युत प्राधिकरणाचे अध्यक्ष घनश्याम प्रसाद, केंद्रीय विद्युत नियामक आयोगाचे माजी अध्यक्ष प्रमोद देव, महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाचे माजी अध्यक्ष व्ही. पी. राजा, आयपीपीएआयचे संचालक हॅरी धौल, हरयाणा विद्युत नियामक आयोगाचे माजी अध्यक्ष आर. एन. प्रशेर आणि इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सीचे माजी संचालक चिंतन शाह उपस्थित होते. आयपीपीएआय ही संस्था १९९४ साली स्थापन झाली असून देशातील विद्युत क्षेत्राच्या विकासातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा घडविण्यासाठी तटस्थ मंच म्हणून काम करते. वीज क्षेत्रातील देशभरातील मान्यवर या संस्थेशी जोडलेले आहेत.

महावितरणची सर्वोत्कृष्ट वीज वितरण कंपनी म्हणून निवड करताना वीज ग्राहक संख्या, विजेची विक्री, विजेची उत्तम उपलब्धता, बिल वसुलीची कामगिरी, वितरण हानी, अपारंपरिक ऊर्जा वापर आणि स्मार्ट मीटरचा वापर अशा अनेक बाबींचा विचार करण्यात आला.

महावितरणला ग्राहकांमध्ये जागृती निर्माण करणारी सर्वोत्कृष्ट वीज वितरण कंपनी म्हणूनही पुरस्कार मिळाला. याबाबतीत महावितरणचे ग्राहक कॉल सेंटर, तक्रारीसाठी टोल फ्री नंबरची उपलब्धता, राज्यभरातील ग्राहक तक्रार निवारण केंद्रे, सौर ऊर्जेचा वापर करण्यासाठी ग्राहकांना केलेले मार्गदर्शन, वीज अपघात टाळण्यासाठी केलेली जागृती, ग्राहक मेळावे, ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी केलेला सोशल मीडिया तसेच वृत्तपत्रांचा व चॅनेल्सच्या माध्यमाचा वापर इत्यादींचा विचार करण्यात आला.

महावितरणने रेडिओ फ्रिक्वेन्सी आधारित मीटर रिडिंगचा वापर चालू केला आहे. राज्यात ९४ लाख मीटरच्या बाबतीत अशी सुविधा सुरू केली असून ही संख्या वाढत आहे. या व्यवस्थेत रेडिओ फ्रिक्वेन्सीचा वापर करून विजेच्या मीटर्सचे अचूक रिडिंग घेता येते. यामुळे बिले अचूक देण्यास मदत होते तसेच वीज वापराची माहिती चांगल्या रितीने उपलब्ध होते. आगामी काळात राज्यातील ग्राहकांना स्मार्ट मीटर देण्यात येणार आहेत.

तसेच, महावितरणने आपल्या कामात माहिती तंत्रज्ञानाचा अत्यंत कल्पकतेने व व्यापक उपयोग केला आहे. महावितरणने विकसित केलेले मोबाईल ॲप्लिकेशन, एसएमएस अलर्ट व्यवस्था, रोख भरणा केंद्रांना ऑनलाईन जोडणे, ‘महा पॉवर पे’, हे स्वतःचे ई वॉलेट विकसित करणे तसेच तक्रार निवारणासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर यांचा विचार पुरस्कार देताना करण्यात आला. कंपनीला ‘इनोव्हेटीव्ह आयटी ॲप्लिकेशन्स इन पॉवर सेक्टर’ या गटातही पुरस्कार मिळाला.


अजून बातम्या वाचा..

मनमाड शहर भाजपा तर्फे 2005 पासून सलग 20 व्या वर्षी भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सर्व क्रांतीवीरांना आदरांजली देणे साठी बुधवार दिनांक 14 ऑगस्ट 2024 रोजी= अखंड भारत दिना =निमित भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

मनमाड शहर भाजपा तर्फे 2005 पासून सलग 20 व्या वर्षी भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सर्व क्रांतीवीरांना आदरांजली देणे साठी बुधवार दिनांक 14 ऑगस्ट 2024 रोजी= अखंड भारत दिना =निमित भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

मनमाड - मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सन 2005 पासून भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सर्व ज्ञात अज्ञात...

read more
मनमाड – बुद्धवाडी येथील महामाया महिला मंडळाच्या वर्षावास समितीच्या अध्यक्षपदी अलकबाई पुंडलिक केदारे एकमताने निवड करण्यात आली.

मनमाड – बुद्धवाडी येथील महामाया महिला मंडळाच्या वर्षावास समितीच्या अध्यक्षपदी अलकबाई पुंडलिक केदारे एकमताने निवड करण्यात आली.

कपिल वस्तू बुद्ध विहारात सुरू असलेल्या वर्षावास कार्यक्रमाच्या नियोजनासाठी मावळत्या अध्यक्षा...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालयास “रांगोळी कलात्मक सौंदर्याचा वेध ” हा दुर्मिळ ग्रंथ भेट

मनमाड सार्वजनिक वाचनालयास “रांगोळी कलात्मक सौंदर्याचा वेध ” हा दुर्मिळ ग्रंथ भेट

मनमाड - धार्मिक /सामाजिक कार्यात अथवा कोणत्याही शुभ कार्यात प्रसन्नता येणे साठी रांगोळी काढण्यात...

read more
नांदगाव तालुकास्तरीय कराटे स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडू विजयी

नांदगाव तालुकास्तरीय कराटे स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयातील खेळाडू विजयी

मनमाड : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे आयोजित जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
मनमाड महाविद्यालयाचे श्री विठ्ठल सातपुते शिक्षणशास्त्र विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण

मनमाड महाविद्यालयाचे श्री विठ्ठल सातपुते शिक्षणशास्त्र विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण

मनमाड : येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथील...

read more
.