विभागीय क्रीडा संकुल नाशिक येथे संपन्न झालेल्या १९ वर्ष आतील मुले मुलींच्या जिल्हास्तरीय शालेय बुध्दीबळ स्पर्धेत कृष्णा मधुकर शिंदे याने सहा पैकी सहा गुण मिळवीत प्रथम क्रमांक मिळविला तसेच निवेदिता संजय देवडे हिने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत पाच गुण प्राप्त केले
कृष्णा व निवेदिता यांची जळगांव येथे होणाऱ्या विभागीय बुध्दीबळ स्पर्धेसाठी नाशिक जिल्हा संघात निवड करण्यात आली आहे
यशस्वी खेळाडूना छत्रे विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे हरीश चंद्रात्रे यांचे मार्गदर्शन लाभले आहे
छत्रे विद्यालयाचे अध्यक्ष पी जे दिंडोरकर सचिव दिनेश धारवाडकर संचालक नाना कुलकर्णी प्रसाद पंचवाघ मुख्याध्यापक आर एन थोरात उपमुख्याध्यापक संदीप देशपांडे पर्यवेक्षिका सौ पोतदार एस एस यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या

राशी भविष्य : ०४ ऑक्टोबर २०२५ – शनिवार
मेष: आज तुमच्यासाठी चांगला दिवस आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्ही निर्णय घेण्याची क्षमता वाढेल....