Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

कलाशिक्षक देव हिरे यांनी साकारलेली छत्रपती शिवाजी महाराजांची जगातील सर्वात लहान पोर्ट्रेट रांगोळी ची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद

Apr 16, 2023

दि.१९ फेब्रुवारी २०२३ शिवजयंती निमित्ताने नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव.ता.चांदवड. शाळेचे कलाशिक्षक श्री.देव हिरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची जगातील सर्वोत्तम लहान पोर्ट्रेट रांगोळी ( साईज २.५ सें. मी. × २.५ सें. मी.) साकारली होती. या रांगोळीची दखल सर्व वृत्तपत्र व टिव्ही न्यूज चॅनल मीडिया मार्फत घेण्यात आली होती. सदर झालेल्या रेकॉर्ड ची वर्ल्डवाईल्ड बुक ऑफ रेकॉर्ड दिल्ली मार्फत ऑफिशियल सर्व पडताळणी करून रेकॉर्ड पास करण्यात आले. सदर रेकॉर्ड प्रमाणपत्र,मेडल,वर्ल्ड बुक रेकॉर्ड आय.डी.कार्ड, वर्ल्ड बुक रेकॉर्ड चिन्ह, व शुभेच्छापत्र किट कुरिअर मार्फत प्राप्त झाले.
छत्रपती शिवाजी महाराजांची सर्वात लहान पोर्ट्रेट रांगोळी ची वर्ल्ड बुक रेकॉर्ड मध्ये नोंद झाल्याचा खूप आनंद व समाधान आहे. या सर्व कार्यात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मदत करणारे मित्र व कलेला शुभेच्छा देणाऱ्या सर्व कलारसिक हातांचे शतशः धन्यवाद देव हिरे सर यांनी मानले आहे.

 

अजून बातम्या वाचा..

महाराष्ट्र सरकारच्या संविधान जागृती उपक्रमाचे स्वागत ; भारतीय संविधान हा स्वतंत्र विषय शाळा महाविद्यालयातून शिकवला जावा : अध्यापकभारतीचे संस्थापक शरद शेजवळ यांची मागणी

महाराष्ट्र सरकारच्या संविधान जागृती उपक्रमाचे स्वागत ; भारतीय संविधान हा स्वतंत्र विषय शाळा महाविद्यालयातून शिकवला जावा : अध्यापकभारतीचे संस्थापक शरद शेजवळ यांची मागणी

भारतीय संविधान हा विषय शाळा महाविद्यालय-विद्यापीठ अभ्यासक्रमात समाविष्ट करून संविधान मूल्य-विचार...

read more
मनमाड महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनात तंत्रज्ञानाचे महत्व याबाबत मार्गदर्शन

मनमाड महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनात तंत्रज्ञानाचे महत्व याबाबत मार्गदर्शन

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे दिनांक 29 मार्च 2022...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]