तब्बल तीन वर्षांपासून शहराध्यक्ष नसलेल्या मनमाड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष पदी मनमाड चे प्रसिद्ध व्यापारी दीपक गोगड यांची आज निवड करण्यात आली.त्यांच्या नियुक्तीचे पत्र आज नाशिक येथे भुजबळ फार्म हाऊस येथे राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार व नांदगाव तालुक्याचे माजी आमदार पंकज भुजबळ यांच्या उपस्थितीत देण्यात आले. मनमाड शहर तसेच नांदगाव तालुक्यात पक्षाला गतवैभव मिळवून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे याप्रसंगी पंकज भुजबळ म्हणाले
याप्रसंगी माजी आमदार संजय पवार, माजी नगराध्यक्ष योगेश पाटील, रईस फारुकी,राजाभाऊ जाधव, दीपक गोगड, हाबिबभाई शेख, योगेश जाधव,राजू करकाले,शुभम गायकवाड, नितीन वाघमारे आदी उपस्थित होते.