loader image
[ays_poll id=7]

आमदार सुहास आण्णा रहेनूमा फाउंडेशनच्या वतीने शिरखुर्मा वस्तु वाटप

Apr 19, 2023


रमजान ईद निमित्त आमदार सुहास आण्णा रहेनुमा फाउंडेशनच्या माध्यमातून लोकप्रिय आमदार सुहास आण्णा साहेबांच्या मदतीने नांदगाव शहरात आणि आजू बाजूच्या खेड्या पाड्यातील मुस्लीम समाजातील गरीब, निराधार, विधवा, गरजवंत कुटुंबाला शिरखुर्मा साठी आवश्यक सुखामेवा वस्तूंचा किट तयार करून स्थानिकांच्या शिफारशी व सुझाव नुसार गरीब गरजवंत कुटुंबांना घरपोच वाटप करण्यात आले.
मुस्लीम धर्मीयांचा वर्षातील सर्वात मोठा सण “ईद-उल-फित्र” साजरा होत असताना आपल्या अवती भोवती असलेल्या गोर -गरीब कुटुंबांची ही ईद गोड व्हावी या उदार हेतूने आमदार सुहास आण्णा साहेबांच्या मदतीने शहरातील तसेच तालुक्यातील न्यायडोंगरी,परधडी, जातेगाँव, बोलठाण,भालूर सह आसपासच्या कुटुंबांना घरपोच शिरखुर्मा साठी आवश्यक वस्तू सुखामेवा सामानाचा किट ज्यात काजू, बदाम, पिस्ता, खोबरे सह एकूण 9 वस्तूंचा समावेश असून गरजवंत कुटुंबांना आमदार सुहास आण्णा रहेनुमा फाऊंडेशनचे सभासद व स्थानिक कार्यकर्त्याच्या मार्गदर्शनाने घर घर जाऊन किटचे वाटप करण्यात आले.
या आनंदाच्या सणानिमित्त आमदार सुहास आण्णा साहेबांनी आपल्या सारख्या सामान्य जनतेचा विचार करून आपल्यासाठी, इतक्या महाग मोलाच्या वस्तू अगदी घरपोच पाठवल्याचे पाहून अनेकांची डोळे पाणावले सर्वांनी मनापासून सुहासआण्णा साहेबांना व रहेनुमा फाऊंडेशनच्या सदस्यांना दुआ देत आभारही मानले.


अजून बातम्या वाचा..

नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघ व मनमाड शहर पोलीस स्टेशनतर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त गड किल्ले बांधणी स्पर्धा

नांदगाव मनमाड मराठी पत्रकार संघ व मनमाड शहर पोलीस स्टेशनतर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त गड किल्ले बांधणी स्पर्धा

मनमाड ता ८ : 'चला मग किल्ला बनवूया, मातीशी नाते जोडू या' हे ब्रीद वाक्य घेऊन आगामी शिवजयंती...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँन्ड ज्यु. कॉलेज मनमाड मध्ये इ. १२ वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च २०२५ आसनव्यवस्था जाहीर

एच.ए.के.हायस्कूल अँन्ड ज्यु. कॉलेज मनमाड मध्ये इ. १२ वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च २०२५ आसनव्यवस्था जाहीर

मनमाड : इयत्ता १२ वी प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी / मार्च 2025 केंद्र क्रमांक 0236...

read more
.