loader image
[ays_poll id=7]

एन आर एम यू ची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न ! बाप आणून द्या परतुनी ….. वेणू नायर साहेबांना आर्त विनवणी !

Apr 22, 2023


मनमाड मध्ये वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी आलेले एनआरएमयू चे महामंत्री कॉम.वेणू नायर साहेबांचा आजचा दौरा हा भरगच्च कार्यक्रमांनी भरलेला होता.या दरम्यान लासलगाव येथील दुर्घटनेत बळी गेलेल्या चार ही रेल्वे कामगारांच्या घरी महामंत्रीनी सांत्वनपर भेट दिली तेव्हा एका चिमुरड्यांन विचारले की माझ्या बापाला कधी परत आणनार ? काळीज पिळवटून टाकणाऱ्या या प्रश्नांनी उपस्थितांना अश्रू अनावर झाले.त्या ठिकाणी महामंत्री यांनी आश्र्वत केले की चार ही दिवंगत कामगारांच्या आश्रितांना पेन्शन लवकर लागू करण्याचे काम करण्यात येईल.या नंतर मनमाड मध्ये TRD डेपो मध्ये युवा शाखा फलक उद्घाटन करण्यात येऊन सी एंड डब्लू विभागाला सदिच्छा भेट देऊन तेथील कामगारांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या तसेच स्टेशन वर ऑपरेटिंग विभागाचे फलक उद्घघाटन करण्यात येऊन संध्याकाळी NPS च्या विरोधात रैली काढण्यात आली.या रैलीत युवा वर्गाचा सहभाग वाखण्याजोगा होता अत्यंत जोशपूर्ण वातावरणात ही रेली डॉ.बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगणावर
आयोजित वार्षिक सर्वसाधारण सभेच्या मुख्य कार्यक्रम प्रसंगी आणन्यात आली.या ठिकाणी ओपन लाईन व कारखाना शाखा यांची संयुक्तपणे वार्षिक सार्वसाधारण सभा घेण्यात आली ओपन लाईन शाखेचे सचिव श्री अंबादास निकम व कारखाना सचिव रमेश केदारे यांनी अनुक्रमे आप आपले सचिव रिपोर्ट सभेसमोर वाचून दाखविला सर्वानुमते
अनुमदित करण्यात येऊन या प्रसंगी उपस्थितांचे स्वागत करण्यात आले
या वेळी cwm श्री मयांक सिंग साहेब,पी आय संदीप देशवर, मंडल सचिव ईसरार खान, माजी मंडल सचिव आर.आर.निकम ई.उपस्थित होते.या कार्यक्रमाचे बहारदार सूत्र संचालन कॉ.ज्ञानेश्वर पिसे यांनी केले व आभार प्रदर्शन कॉम.शबरिश नायर यांनी केले.या कार्यक्रमासाठी सर्व ऑफिस बेअरर तसेच कॉम.एच.डी.डोंगरे, आनंद भारस्कर,किरण शिंदे,मिलिंद लिहिणार,सतीश गांगुर्डे,गौतम निकम आदी सर्व विभाग यांचे सहकार्य लाभले या सोबतच कारखाना शाखा,चाळीसगाव शाखा,नाशिक रोड शाखा ई.विभागातील सर्व पदाधिकारी सहभागी झाले होते.

00


अजून बातम्या वाचा..

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे आयोजित संघटन पर्व 2024-25 अंतर्गत भाजपा सदस्य नोंदणी अभियानाला उस्फुर्त प्रतिसाद

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे आयोजित संघटन पर्व 2024-25 अंतर्गत भाजपा सदस्य नोंदणी अभियानाला उस्फुर्त प्रतिसाद

विश्वातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असणाऱ्या भाजपा च्या संघटन पर्व 24-25 अंतर्गत मनमाड शहर भाजपा...

read more
के आर टी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

के आर टी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर. मुख्याध्यापक दीपक व्यवहारे. उपप्राचार्य...

read more
.